Gopichand Padalkar News : पडळकर विखेंना म्हणाले, 'भंडाऱ्याला आशीर्वाद समजा' ; आंदोलकांनी त्याचा वापर...

Dhangar Reservation News : राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर आहेत.
Gopichand Padalkar News
Gopichand Padalkar NewsSarkarnama
Published on
Updated on

Solapur : मराठा आंदोलनाबरोबरच आता धनगर समाजही आरक्षणासाठी पुढे सरसावला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आज (शुक्रवारी) धनगर आरक्षण कृती समितीकडून भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडारा उधळण्यात आला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी विखे पाटलांना खंडोबाच्या भंडाऱ्याची महती सांगत " आशीर्वाद " समजून कपाळाला लावा," असे सुचवले

"खंडोबाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा भंडारा हा श्रद्धेचं प्रतीक आहे. त्याचा आंदोलनासाठी वापर करू नका. जर काहींनी तो विखे पाटलांवर उधळला असेल तर त्याला त्यांनी आशीर्वाद समजावा," असे पडळकर म्हणाले.

Gopichand Padalkar News
Maratha Reservation News: टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका; जरांगे पाटलांची मराठा तरुणांना विनंती

"धनगर समाजाच्या आरक्षणाची कायदेशीर लढाई मुंबई उच्च न्यायालयात आपण लढतो आहोत. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य केले आहे. आम्हाला खात्री आहे की मल्हारी मार्तंड खंडोबा नक्कीच आपल्याला यश देईल," असे पडळकर म्हणाले.

राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर आरक्षण कृती समितीचे काही सदस्य त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी विखे पाटलांनी निवेदन दिले.

Gopichand Padalkar News
BJP Meeting News : फडणवीस-बावनकुळेंची आमदार-खासदारांशी 'वन टू वन' चर्चा; असमाधानकारक कामगिरी असलेल्या...

शंकर बंगाळे यांनी अचानक विखेंच्या डोक्यावर भंडारा उधळला. शंकर बंगाळे आज सोलापूरमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना निवेदन देण्या साठी गेले होते . त्यांनी विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळून राग व्यक्त केला. विखेंच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना चोप दिला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप धनगर आरक्षण कृती समितीने केला आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com