Chandrababu Naidu News : चंद्राबाबूंच्या अटकेमागील नेमके कारण काय?

Andhra Pradesh Politics : चंद्राबाबू यांना अटक करण्याची गरज काय?
Chandrababu Naidu News
Chandrababu Naidu News Sarkarnama
Published on
Updated on

Hyderabad : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी पहाटे कौशल विकास गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुका होणार असल्याने राजकारण ढवळून निघाले आहे. पिता-पुत्राच्या अटकेनंतर आंध्र प्रदेशच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Chandrababu Naidu arrested in corruption case)

चंद्राबाबूंवर ११८ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा तसेच ३५० कोटींच्या घोटाळ्याचा आरोपही आहे. हे सर्व प्रकरण पाहता आपल्याला अटक होईल, असे चंद्राबाबू यांनी यापूर्वीच सांगितलं होते. त्यामुळे त्यांच्या अटकेला राजकीय किनार आहे. कौशल विकास घोटाळ्याची कोणत्याही पुराव्याशिवाय कोर्टात केस सुरू असताना चंद्राबाबू यांना अटक करण्याची गरज काय? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.

Chandrababu Naidu News
NCP News : शरद पवार गटाच्या शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला ; हल्लेखोराला नागरिकांकडून चोप

एनटी रामराव १९९५ मध्ये सत्तेच्या शिखरावर होते. त्याच वेळी आठच दिवसात त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागले. चंद्राबाबू नायडूंनी आपले मेहुणे डॉक्टर दग्गूबत्ती वेंकटेश्वर राव यांना उपमुख्यमंत्रिपदाची लालूच दाखवून आपल्याकडे वळवून घेतलं. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच चंद्राबाबू नायडू आपली पत्नी भुवनेश्वरी आणि मुलगा लोकेश यांच्यासह एनटीआर यांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला गेले. पण त्यांनी भेट दिली नाही. चंद्राबाबू नायडूंना तेलुगू देशमच्या १८३ आमदारांचं समर्थन होते.

Chandrababu Naidu News
MLA Disqualification News : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत मोठी अपडेट ; पुढील आठवड्यापासून सुनावणी, पुरावे सादर करा..

चंद्रबाबू नायडू यांनी तेलगू देसम पक्षावर स्वतःचा ताबा ठेवत चर्चेत राहिले. त्यानंतर कधी भाजप सोबत हातमिळवणी करीत ते सत्तेत राहिले. तर कधी काँग्रेस व भाजपला अंतरावर ठेवत राजकारणात चंद्राबाबू नायडू यांनी विशेषस्थान टिकवून ठेवले होते. त्यांनतर आता वायएसआर काँग्रेसने एनडीएशी जवळीकता साधून चंद्राबाबू नायडू यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु ठेवले असल्याचे बोलले जाते.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com