MLA Disqualification News : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत मोठी अपडेट ; पुढील आठवड्यापासून सुनावणी, पुरावे सादर करा..

Maharashtra Politics : अपात्रतेच्या कार्यवाहीपासून वाचण्यासाठी युक्तीवाद करावा लागणार आहे.
Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Eknath Shinde news
Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Eknath Shinde newsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाल दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालानंतर आमदार निलंबनाचा चेंडू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात टोलवला आहे. आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 14 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस बजावण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नार्वेकरांनी नोटीस बजावली असल्याची माहिती विधिमंडळ सुत्रांनी दिली.

Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Eknath Shinde news
Rakhi Jadhav News : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेला न्यायालयाचा दणका ; भाजपच्या मंत्र्यांवर केला होता आरोप...

सुनावणीत आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. अपात्रतेच्या कार्यवाहीपासून वाचण्यासाठी युक्तीवाद करावा लागणार आहे. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार सुनावणी होणार आहे.

आमदार अपात्रता प्रकरणात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. या प्रकरणात लवकच सुनावणी सुरु होईल. कायदा आणि नियम यांचा सर्वांगीण विचार, पालन करुणच कोणताही निर्णय घेतला जाईल. त्यासाठी या आमदारांना लवकरच सुनावणीसाठी बोलावण्यात येईल, असेही नार्वेकरांनी यापूर्वी सांगितले आहे.

Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Eknath Shinde news
Chandrababu Naidu Arrested : मोठी बातमी : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

शिवसेना बंडखोर आमदार अपात्रता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. यावर प्रदीर्घ सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंनी तगडे वकील देण्यात आले.या प्रकरणाला देशभरात ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्या आणि शेवटी निर्णय देताना तो विधानसभा अध्यक्षांवर सोपवला. आता राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com