Kapil Raj Joins Reliance : दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणारा ईडीचा अधिकारी रिलायन्समध्ये करतोय नोकरी!

Former ED Officer Kapil Raj Arvind kejriwal Hemant soren : ईडीतून सेच्छानिवृत्ती घेतलेले कपिल राज यांनी आता कार्पोरेट क्षेत्रात नोकरी स्वीकारली आहे. ते रिलायन्समध्ये रुजू झाले आहेत.
AAP chief Arvind Kejriwal
AAP chief Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Kapil Raj News : ईडी (ED) मध्ये कार्यरत असताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करणारे अधिकारी कपिल राज यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये नोकरीला लागले आहेत.

कपिल राज हे २००९ च्या बॅचचे माजी आयआरएस (IRS) अधिकारी आहेत. त्यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी, म्हणजेच १७ जुलैला, खासगी कारणांमुळे सरकारी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि खासगी क्षेत्रात नोकरी स्वीकारली. या संदर्भात रिलायन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या नोकरी स्वीकारण्यावर किंवा सोडण्यावर कोणतीही टिप्पणी करत नाही."

कपिल राज यांचा ईडीमधील कार्यकाळ ८ वर्षांचा होता आणि या काळात त्यांनी अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला.कथित दारू धोरण घोटाळ्यात त्यांनी दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती.जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली होती.

AAP chief Arvind Kejriwal
Uday Samant: शेवटच्या रांगेत बसून ठाकरे राहुल गांधीचं 'नाटक' बघत होते...; सामंतांचा टोला

देशभरात गाजलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व त्यांनी केले होते. तसेच मुंबईत उपसंचालक असताना त्यांनी डीएचएफएल (DHFL) आणि इक्बाल मिर्ची प्रकरणाचाही तपास केला होता.

कपिल राज यांचा प्रवास

मूळचे उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे रहिवासी असलेले कपिल राज यांनी लखनौमधून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन आयआरएस अधिकारी म्हणून कारकीर्द सुरू केली. स्वेच्छानिवृत्ती घेण्यापूर्वी ते दिल्लीमध्ये जीएसटी (GST) इंटेलिजन्स विंगमध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होते.

सरकारी नोकरी सोडून कॉर्पोरेट क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेणारे कपिल राज हे पहिले अधिकारी नाहीत. याआधीही अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर किंवा स्वेच्छानिवृत्ती घेऊन कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदे भूषवली आहेत.

AAP chief Arvind Kejriwal
Tamil Nadu SEP : तामिळनाडू सरकारनं जाहीर केलं 'द्विभाषा' शैक्षणिक धोरण! NEPला थेट आव्हान; 'या' कमिटीनं दिला हिरवा कंदील

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com