Champai Soren : अखेर चंपई सोरेन यांची मोठी घोषणा; भाजपची बल्लेबल्ले, आघाडीला दणका

BJP Assembly Election 2024 Hemant Soren : चंपई सोरेन यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट करत झारखंड मुक्ती मोर्चामध्ये राहणार नसल्याचे जाहीर केले होते.
Champai Soren
Champai SorenSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी अखेर बुधवारी मोठी घोषणा केली. भाजपमध्ये प्रवेश न करता स्वतंत्र पक्ष स्थापन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा भाजपलाच होणार असल्याचे दिसते. तर आघाडीला मोठा दणका बसणार आहे.

चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपद काढून घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ज्या पध्दतीने आपला अपमान करण्यात आला, ते सहन करू शकत नसल्याचे सांगत त्यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचे संकेत देताना तीन समोर तीन पर्याय ठेवले होते. अखेर त्यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याचे जाहीर केले आहे.

Champai Soren
Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेसाठी भाजपमध्ये पुन्हा ‘आयाराम’ ठरले वरचढ; निष्ठावंत वेटिंगवरच...

झारखंडमधील विधानसभा निवडणूक पुढील काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे नवीन पक्ष काढून विधानसभेला कसे सामोरे जाणार, या प्रश्नावर त्यांनी त्याची तुम्ही काळजी करू नका, असे विधान केले. एका दिवसांत 30 ते 40 हजार कार्यकर्ते जमा झाले होते. पुढील आठवडाभर सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विरुध्द एनडीए असा थेट सामना होणार आहे. चंपई सोरेन यांनी नवीन पक्ष काढल्यास त्यांना निवडणुकीची तयारी करणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांना इतर पक्षांशी आघाडी करावी लागणार, हे स्पष्ट आहे. त्यांनी तसे संकेतही दिले आहेत.

Champai Soren
Chirag Paswan : चिराग पासवान पाच खासदारांच्या ताकदीवर थेट मोदींना भिडतात! आज आगडोंब उसळला...

झारखंडमध्ये इंडिया आघाडीत झारखंड मुक्ती मोर्चासोबत काँग्रेस आणि आरजेडी हे पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यासोब सोरेन जाणार नाहीत. त्यांना एक सुरक्षित पर्याय एनडीएचा म्हणजेच भाजपचा आहे. निवडणुकीआधी भाजपशी आघाडी करून ते आपल्या पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरवू शकतात. त्याचा एनडीएला फायदा होऊ सकतो.

चंपई सोरेन यांच्यासमोर आणखी एक पर्याय आहे. ते स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात. तसे झाले तरीही एनडीएलाच अधिक फायदा होणार आहे. चंपई सोरेन यांचे उमेदवार इंडिया हेमंत सोरेन यांच्या पक्षाचीच मते मिळवणार आहेत. त्यामुळे आघाडीच्या मतांची टक्केवारी घसरू शकते. त्यामुळे चंपई सोरेन यांनी कोणतेही पाऊल उचलले तरी भाजपच लाभार्थी ठरणार असल्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com