Chirag Paswan : चिराग पासवान पाच खासदारांच्या ताकदीवर थेट मोदींना भिडतात! आज आगडोंब उसळला...

NDA Government Narendra Modi SC ST Reservation Bharat Bandh : चिराग पासवान यांनी 21 ऑगस्टच्या भारत बंदला उघडपणे पाठिंबा दिला आहे.
Chirag Paswan, Narendra Modi
Chirag Paswan, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : बिहारमधील लोक जनशक्ती (रामविलास पासवान) पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान बुधवारी सोशल मीडियात ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्याला कारणही तसेच आहे. केवळ पाच खासदारांच्या ताकदीवर ते थेट एनडीए सरकारला भिडत आहे. एससी, एसटी आरक्षणातील उपवर्गीकरणास पासवान यांनी उघडपणे विरोध करत बुधवारच्या भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वीच एससी, एसटी आरक्षणांतर्गत उपवर्गीकरणावर शिक्कामोर्तब केले आहे. या निकालाला विरोध करणारे चिराग पावसान हे पहिले केंद्रीय मंत्री होते. पण ही केवळ एकच घटना नाही. त्यांनी वक्फ सुधारित अधिनियमालाही त्यांनी सभागृहातून बाहेर जात अप्रत्यक्ष विरोध केला. यूपीएससीकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परीक्षेविना भरतीच्या निर्णयावरही ते नाराज होते.

लोकसभा निवडणुकीत पावसान यांच्यासह पक्षाचे पाच खासदार निवडून आले. ते एनडीएसोबत निवडणूक लढले होते. त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे ते सातत्याने कौतुक करताना दिसतात. पण त्याचवेळी काही निर्णयांवर उघडपणे विरोध करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांची हीच गोष्ट लोकांनाही भावत आहे.

Chirag Paswan, Narendra Modi
Badlapur Protest : बदलापूर घटनेनंतर महाराष्ट्र विरूध्द कोलकाता पोलिस; ममतांच्या खासदारांचा भडका  

पासवान यांनी भारत बंदला पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्याविषयी लोकांमधून उमटणाऱ्या प्रतिक्रियाही बोलक्या आहेत. सत्तेत असूनही पासवान यांच्याकडून सरकारविरोधी भूमिका घेतली जात असल्याची चर्चा रंगली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात आपण पंतप्रधान मोदींसमोर ही बाब मांडल्याचे पासवान यांनी सांगितले होते.

वक्फ सुधारित विधेयक लोकसभेत आल्यानंतर पासवान सभागृहातून बाहेर पडले होते. हे विधेयक आधी संसदीय समितीकडे पाठवावे, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले.

Chirag Paswan, Narendra Modi
Champai Soren : ऑपरेशन लोटस फेल? दिल्लीतून परतलेल्या चंपई सोरेन यांची नवी इनिंग...

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 45 अधिकाऱ्यांच्या परीक्षेविना भरतीच्या निर्णयाला विरोध केला होता. चिराग पावसान यांनीही आरक्षणाला डावलून भरती करता येणार नाही, अशी भूमिका घेत या भरतीला उघडपणे विरोध केला होता. त्यानंतर मंगळवारी सरकारने यूपीएसली पत्र पाठवून ही भरती रद्द करण्याचे आदेश दिले.

चिराग पासवान हे स्वत:ला आपण पंतप्रधान मोदींचे हनुमान असल्याचे म्हणतात. पण त्यांच्या विरोधामुळे सरकारला यू-टर्न घ्यावा लागत असल्याचेही प्रकर्षाने जाणवत आहे. एनडीए सरकारमधील टीडीपी, जेडीयू आणि शिवसेना या इतर मित्रपक्षांपेक्षा कमी खासदार असूनही पासवान सरकारला अंगावर घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

बिहार, उत्तर प्रदेशात भारत बंदची धग

भारत बंदला प्रामुख्याने बिहार आणि उत्तर प्रदेशात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पासवान हे बिहारचे असून त्यांचाही पाठिंबा असल्याने पक्षाचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले आहेत. अनेक शहरांमध्ये बंदचा परिणाम दिसून येत असून काही ठिकाणी पोलिसांना लाठीमारही करावा लागला आहे. काही भागात रस्त्यावर टायर पेटवण्यात आले असून तणाव निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com