Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या बलात्कारी नातवाला तुरुंगातही महत्वाची जबाबदारी; दिवसाला मिळणार 522 रुपये मानधन

Prajwal Revanna Jail Job : कर्नाटकातील हसन येथील माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या ते बंगळुरुमधील पैरप्पाना अग्रहरी जेलमध्ये असून येथेही त्यांच्यावर तुरुंग प्रशासनाने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.
Prajwal Revanna Sex Scandal
Prajwal Revanna Sex ScandalSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. माजी खासदार प्रज्वल रेवन्ना याला बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  2. न्यायालयाने त्याच्यावर 10 लाखांचा दंड ठोठावला आहे.

  3. तो सध्या बंगळुरुतील पैरप्पाना अग्रहरी तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

  4. तुरुंग प्रशासनाने त्याला लायब्ररी क्लार्कचे काम सोपवले आहे.

  5. या कामासाठी त्याला दररोज 522 रुपयांचे वेतन मिळणार आहे.

Bengaluru News : भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू आणि बलात्कारी माजी खासदार प्रज्वल रेवन्ना याला जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या तो बंगळुरुमधील पैरप्पाना अग्रहरी जेलमध्ये शिक्षा भोगत असून तुरुंग प्रशासनाने जेलमध्ये एक मोठी जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. रेवन्नाकडे तुरुंग प्रशासनाने लायब्ररी क्लार्कचं काम सोपवलं आहे. त्यासाठी त्याला रोज 522 रुपयांचे वेतनही देण्यात येणार आहे. प्रज्वल रेवन्ना याच्यावर अनेक महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्यावर घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.

कर्नाटकातील हसन येथील माजी खासदार प्रज्वल रेवण्णा माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू असून त्याचे वडील कुमारस्वामी सध्या केंद्रात अवजड उद्योग मंत्री आहेत. 24 एप्रिल 2024 रोजी हासनच्या स्टेडियमवर शेकडो पेन ड्राइव्ह सापडल्याने खळबड उडाली होती. या पेन ड्राइव्हमध्ये प्रज्वल रेवण्णांचे 2900 हून अधिक व्हिडीओ क्लिप्स आणि फोटो होते.

Prajwal Revanna Sex Scandal
Prajwal Revanna Rape Case : प्रज्वल रेवण्णा ‘कैदी क्रमांक 15528’; निकालानंतर मौन, तर तुरुंगात रात्रभर जागरण

या व्हिडीओत त्याने अनेक महिलांसोबत बळजबरीने, दमदाटी करुन शरीरसंबंध ठेवल्याचं समोर आलं. त्यानंतर, याप्रकरणी पन्नास महिलांच्या तक्रारी आल्या. बारा महिलांनी त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. तर एका 47 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर सिद्ध झाला. त्या महिलेच्या साडीनेच रेवन्ना याला जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहचवलं असून सध्या तो तुरूंगात आहे. तसेच त्याला 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यादरम्यान जेल प्रशासनाच्या माहितीनुसार, रेवण्णा याच्यावर तुरुंग प्रशासनाने महत्त्वाची जबाबदारी दिली असून त्याला पैरप्पाना अग्रहरी कारागृहात लायब्ररी क्लर्क बनवण्यात आले आहे. यासाठी त्याला दररोज 522 रुपयांचे मानधन मिळणार आहे. रेवण्णा याच्यावर इतर कैद्यांना पुस्तके देणे आणि त्याची नोंद ठेवणे ही जबाबदारी असेल. जेल नियमांनुसार, आयुष्‍यभराची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी काही प्रकारचे काम करणे बंधनकारक आहे. या कामांची निवड त्यांच्या कौशल्य आणि स्वेच्छेवर आधारित असते. कैद्यांनी दर आठवड्यात साधारणतः 3 दिवस, म्हणजे दर महिन्याला 12 दिवस, काम करावेच लागते.

हासनच्या स्टेडियमवर शेकडो पेन ड्राइव्ह सापडल्याने एकच खळबड उडाली होती. ज्यात रेवण्णांचे 2900 हून अधिक व्हिडीओ क्लिप्स आणि फोटो सापडले होते. यानंतर रेवण्णाचा शोध घेतला जात होता. पण तो विदेशात पळून गेल्याचे सिद्ध झाले होते. यानंतर 31 मे रोजी जर्मनीतून तो भारतात परत येताच त्याला विमानतळावरच अटक झाली होती.

यानंतर त्याला न्यायालयात घरकाम करणाऱ्या 47 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात 26 साक्षीदार, शेकडो कागदपत्रे आणि अडतीस सुनावण्या झाल्या. त्यामध्ये प्रज्वल रेवन्नाला जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

Prajwal Revanna Sex Scandal
Prajwal Revanna : बलात्कार प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय, प्रज्वल रेवण्णा दोषीच; जन्मठेप अन् पाच लाख दंडाची शिक्षा

FAQs :

प्र.१: प्रज्वल रेवन्नाला कोणत्या प्रकरणात शिक्षा झाली आहे?
उ. महिलांवर बलात्कार प्रकरणी शिक्षा झाली आहे.

प्र.२: त्याला किती शिक्षा ठोठावली गेली आहे?
उ. जन्मठेप आणि 10 लाखांचा दंड ठोठावला आहे.

प्र.३: तो सध्या कुठे शिक्षा भोगत आहे?
उ. बंगळुरुतील पैरप्पाना अग्रहरी तुरुंगात.

प्र.४: तुरुंगात त्याला कोणते काम सोपवले आहे?
उ. त्याला लायब्ररी क्लार्कची जबाबदारी दिली आहे.

प्र.५: तुरुंगात कामासाठी त्याला किती वेतन मिळणार आहे?
उ. त्याला रोज 522 रुपयांचे वेतन मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com