
प्रज्वल रेवण्णा यांना एका खास न्यायालयाने गृहकामगारासोबत बलात्कार व अपहरण केस मध्ये दोषी ठरवून जीवनपर्यंत कारावास व ₹5–10 लाख दंडाची शिक्षा दिली आहे.
फडणिवीस न्यायालयीन सुनावणीदरम्यान रेवण्णा भावूक झाले आणि त्यांनी 'माझी एकच चूक राजकारणात फार लवकर वाढणे होती' असे सांगून निवेदन केले.
हा निकाल म्हणजे देवगौडा कुटुंबाच्या राजकीय प्रतिष्ठेस एका मोठा धक्का असून, राजकीय जगातही याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे
Bangalore News : जनता दल सेक्युलरचे नेते आणि कर्नाटकातील हासन मतदारसंघाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांना न्यायालयाने दणका दिला आहे. महिलांचे लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणात रेवण्णा यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तसेच या प्रकरणात जन्मठेप आणि पाच लाख दंडाची शिक्षा ठोठावली. या निकालानंतर रेवण्णा कोर्टामध्ये ढसा ढसा रडताना दिसले. त्यामुळे आता रेवण्णा यांना न्यायालयाचा असा निर्णय येईल असे अपेक्षित नसल्याचे दिसत आहे. (Prajwal Revanna sentenced to life imprisonment in rape and abduction case involving domestic worker; grandson of former PM Deve Gowda convicted)
रेवण्णा हे भारताचे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे नातू असून ते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे पुत्र आहेत. या दोघांच्या राजकीय पटलावर पाऊल ठेवत ते राजकारणात आले. ते हासन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. रेवण्णा गेल्या 14 महिन्यांपासून तुरुंगात असून त्यांच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि बलात्काराचे आरोप आहेत. तसेच सोशल मीडियावर रेवण्णा यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण बाहेर आले होते. अधिक तपासानंतर त्यांच्याकडे जवळपास पाच हजार महिलांचे अश्लिल व्हिडिओ सापडले होते. ज्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अटक झाली होती. दरम्यान उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही त्याच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आले. मात्र तिथेही रेवण्णा यांना यश आले नाही.
मोलकरणीवर बलात्कार
रेवण्णा यांनी त्यांच्या फार्महाउसमध्ये काम करणाऱ्या 47 वर्षीय मोलकरणीला देखील सोडले नाही. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणी त्या महिलेने एप्रिल 2024 मध्ये तक्रार दाखल केली होती. ज्यात रेवण्णा त्यांनी तिच्यावर 2021 पासून वारंवार बलात्कार करण्यासह त्या घडनेचे व्हिडिओ करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास तो व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिल्याचा दावाही त्या महिलेनं केला होता.
यानंतर रेवण्णा याच्यावर बलात्कार, धमकी देणे आणि अश्लील फोटो व्हिडीओ लीक करण्याची धमकी देण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान 2024 मध्ये उगडकीस आलेल्या सेक्स स्कॅण्डलमध्येही रेवण्णाचे नाव चर्चेत आले होते. रेवण्णा याच्यावर 50 हून अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर प्रज्वल न्यायालयातच ढसा ढसा रडला, यावेळी त्याने न्यायालयाकडे विनंती केल्याचे कळत आहे. यावेळी प्रज्वल म्हणाला, पीडित महिलेने, तिचा पती किंवा नातेवाईकांसह कोणाकडेही कथित बलात्काराची तक्रार केलेली नाही. काही व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर तिने ही तक्रार केली आहे. माझेही एक कुटुंब आहे, मी सहा महिन्यांपासून माझ्या पालकांना पाहिलेलं, भेटलेलो नाही. कृपया मला कमी शिक्षा देण्यात यावी, हीच मी न्यायालयाला विनंती करतो. तर माझ्या आयुष्यात मी केलेली एकमेव चूक म्हणजे मी राजकारणात खूप वेगाने पुढे गेलो, असेही प्रज्वल म्हणाला.
1. प्रज्वल रेवण्णा यांना कोणत्या गुन्ह्यांत दोषी ठरवले गेले?
प्रज्वल रेवण्णा यांना आपल्या घरच्या गृहकामगारावर झालेल्या बलात्कार आणि अपहरण प्रकरणात दोषी ठरवले गेले आहे, ज्यात त्याला आयुष्मान कारावास आणि सुमारे ₹5–10 लाख दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
2. कोर्टात रेवण्णा यांनी काय म्हटले?
सजा ऐकतानाच रेवण्णा भावूक झाले. त्यांनी सांगितले की, "राजकारणात खूप लवकर वाढणे हेच माझी एकच चूक ठरली." त्यांनी दोष सिद्ध केल्यानंतर न्यायालयाची शिक्षा स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
3. हा निर्णय राजकीय दृष्ट्या का महत्त्वाचा आहे?
हे निकाल देवगौडा घराण्याच्या प्रतिष्ठेस मोठा धक्का असून, हे फैशन राजकीय वारसा आणि नैतिकतेवरील प्रश्न पुन्हा खोलपात करतात. यामुळे जेडी(एस) पक्षाची भरभराटीही प्रभावित होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.