Balesh Dhankhar Guilty : पाच महिलांवर अत्याचार,'फ्रेंड्स ऑफ भाजप'च्या माजी नेत्याला 40 वर्षांची शिक्षा, 39 गुन्ह्यांमध्ये दोषी

OFBJP Balesh Dhankhar 40 years sentence : बालेश याला सिडनीच्या न्यायालयाने 40 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्याला 30 वर्ष जामीन देखील मिळणार नाही.ऑस्ट्रोलियामध्येही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 Balesh Dhankhar
Balesh Dhankharsarkarnama
Published on
Updated on

Balesh Dhankhar News : भारतीय वंशाच्या बालेश धनखड याला ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने 40 वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. धनखडला पाच महिलांवर बलात्कार आणि एकूण 39 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले.बालेश धनखड हा ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजप’ या संघटनेचा माजी अध्यक्ष होता. सोशल मीडियावर त्याचे भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसोबतचे फोटो आढळून आले होते. मात्र, या प्रकरणानंतर त्याने हे फोटो हटवले.

बालेश धनखड हा मुळचा हरियाणामधील आहे. ऑस्ट्रोलियात डेटा सायंटिस्ट म्हणून कार्यरत होता. त्याने बनावट नोकरीच्या जाहिराती देऊन महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. साक्षींनुसार, तो महिलांना मुलाखतीसाठी हॉटेलमध्ये बोलवत असे आणि त्यांना नशेच्या गोळ्या देऊन त्यांच्याव लैंगिक अत्याचार करत होता. इतकेच नव्हे, तर त्याने या गुन्ह्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले होते. पाच कोरियन महिलांवर त्याने अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

बालेश याला सिडनीच्या न्यायालयाने 40 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्याला 30 वर्ष जामीन देखील मिळणार नाही.ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजप या संघटनेने ट्विट करत माहिती दिली होती की, बालेश धनकर यांनी जुलै 2018 मध्ये ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपच्या आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आम्ही त्यांच्या कृत्याचा तीव्र निषेध करतो.

बालेश धनखड याने आपले फेसबूकवरून अनेक भाजप नेत्यांना भेटल्याचे फोटो शेअर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2014 मधील शपथविधी समारंभाला तो उपस्थित राहिला होता त्याचे देखील फोटो त्याने शेअर केले होते. तसेच नोव्हेंबर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाला गेले तेव्हा बालेश धनखड याने तो पंतप्रधानांचे स्वागत करत असल्याचे फोटे देखील शेअर केले होते.

काँग्रेसची टीका

काँग्रेसने ट्विट करत नरेंद्र मोदी यांचे आवडते बालेश धनखड यांना महिला दिनाच्या दिवशीच ऑस्ट्रोलियात 40 वर्षांची शिक्षा दिली. तसेच आदेश म्हटले की त्यांना 30 वर्षापर्यंत जामीन मिळणार नाही. महिला दिनाच्या दिवशी ही बातमी आली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजप नेत्यांपासून आपल्या मुलींना वाचवा.

 Balesh Dhankhar
Akhilesh Yadav on Modi : अखिलेश मोदींना म्हणाले, ‘इस अंजुमन में आपको आना है बार-बार..’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com