Brijbhushan Singh News: लोकसभेचं तिकीट गमावलेल्या ब्रिजभूषण सिंहांचा पारा चढला ; म्हणाले, 'संध्याकाळी या, फासावर लटकतो!'

Brijbhushn Singh Case: याआधीही लैंगिक छळाच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीवर प्रतिक्रिया विचारताच ब्रिजभूषण सिंह यांनी महिला पत्रकाराचा माईक आणि कॅमेराही तोडला होता.
Brijbhushn Sinh News
Brijbhushn Singh NewsSarkarnama

Brijbhushan Singh news: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी महिला कुस्तीपटूंनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्यावर लैंगिक छळ, महिलांचे ब्लॅकमेलिंग अशा अनेक आरोपांची चौकशी सुरू होती. आता त्यांच्यावरील आरोपांची न्यायालयाकडून निश्चिती करण्यात आल्यामुळे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र, आपण निर्दोष असल्याचं ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांनी न्यायाधीश प्रियंका राजपूत यांच्यासमोर म्हटलं आहे.

दरम्यान, न्यायालयातून बाहेर येताच पत्रकारांनी ब्रिजभूषण यांना काही प्रश्न विचारले असता त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं आहे. 'आरोप निश्चित झाले तर, मी फासावर लटकेल, असं तुम्ही म्हणाला होता त्याचं काय झालं? असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता, ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, "रात्री या फासावर लटकतो. तुम्ही काहीही विनोद करत आहात. मी म्हटलं होतं आरोप सिद्ध झाले तर फासावर लटकेन. परंतु, सध्या केवळ माझ्यावरील आरोप निश्चित झाले आहेत. ते अजून न्यायालयात सिद्ध करायचे आहेत." असं म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल दिली. शिवाय माझ्याकडे मी निर्दोष असल्याचे पुरावे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच न्यायालयाची (Court) एक प्रक्रिया असते, त्याप्रमाणे आपण गेले पाहिजे. मी काहीच गुन्हा केला नाही, तर गुन्ह्यांची कबुली का देऊ? " ब्रिजभूषण सिंह यांच्यावर न्यायालयात सहआरोपी असलेल्या सचिन तोमर (Sachin Tomar) यांच्याविरोधातही धमकी दिल्याप्रकरणी आरोप निश्चिती करण्यात आली आहे. तोमर यांनीदेखील आपण निर्दोष असल्याचं म्हणत आरोप फेटाळले आहेत. मी कोणत्याही महिला कुस्तीपटूला घरी बोलावलं नसल्याचं तोमर यांनी म्हटलं आहे.

याआधी महिला पत्रकाराचा माईक आणि कॅमेराही तोडला

तर याआधी एकदा ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला पत्रकाराचा कॅमेरा फोडला होता. यांच्यावर लैंगिक छळाच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीवर प्रतिक्रिया विचारताच ब्रिजभूषण सिंह यांनी महिला पत्रकाराशी गैरवर्तन करत तिचा माईक आणि कॅमेराही तोडला होता.

Brijbhushn Sinh News
Narendra Modi Marathwada Sabha News : मोदींनी सभा घेतलेल्या पाचपैकी चार जागा 'डेंजर झोन'मध्ये ?

भाजपने लोकसभेचं तिकीट कापलं

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे भाजपने त्यांना लोकसभेचे तिकीट न देता त्यांच्या मुलाला करण शरणसिंह याला मैदानात उतरवलं. त्यामुळे लोकसभेचे तिकीट कापल्यानंतर काही दिवसांनीच ब्रिजभूषण सिंह यांना अनेक धक्यावर धक्के बसताना दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com