Russia-Ukraine War : पंतप्रधान मोदी चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवणार युक्रेन मोहिमेवर

रशियाने युक्रेनविरोधात युध्द पुकारल्याने हजारो भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. शेकडो नागरिकांना मायदेशी आणले जात आहेत.
Russia-Ukraine War: PM Narendra Modi
Russia-Ukraine War: PM Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनविरोधात युध्द (Russia -Ukraine War) पुकारल्याने हजारो भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. शेकडो नागरिकांना मायदेशी आणले जात आहेत. पण अनेकजण युक्रेनमधील विविध शहरांमध्ये अन्न-पाण्याशिवाय राहत आहेत. त्यांना बाहेर पडणेही कठीण जात असल्याने मोदी सरकारने (Modi Government) याची गांभीर्याने दखल घेतली आहे. (Russia Ukraine War Update)

भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा (Operation Ganga) राबवले जात आहे. आतापर्यंत याअंतर्गत शेकडो भारतीयांना परत आणण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेत चार केंद्रीय मंत्र्यांना या मोहिमेवर पाठवण्याचा निर्णय़ घेतल्याचे समजते. हे मंत्री युक्रेनमधील (Ukraine) शेजारीत देशांमध्ये जाऊन भारतीयांना परत आणण्यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर मदत करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली.

Russia-Ukraine War: PM Narendra Modi
युक्रेनचा गनिमीकावा; रशियाला भटकवण्यासाठी उचललं मोठं पाऊल

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी (Hardeep Puri), ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia), किरेन रिजिजू (Kiren Rijiju), आणि जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह (V. K. Singh) या चार मंत्र्यांचा यामध्ये समावेश असल्याचे समजते. दरम्यान, सोमवारी २४९ भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले. आतापर्यंतचे हे पाचवे विमान भारतात उतरले आहे. या सर्वांना रोमानिया येथून आणण्यात येत आहे. तसेच आणखी विमान उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे.

युक्रेनची राजधानी कीव्हमधील साप्ताहिक कर्फ्यूही हटवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे भारतीय दुतावासाने युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना रेल्वे स्थानकांवर जाण्यास सांगितले आहे. युक्रेन सरकारकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना युक्रेनबाहेर पडण्यातील अडथळे काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

Russia-Ukraine War: PM Narendra Modi
युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल

भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण

रशिया-युक्रेनच्या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. या युद्धाच्या परिस्थिती भारत भारतात परत येण्यासाठी निघालेल्या काही विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेवर मारहाण करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भारतीय विद्यार्थ्याने (Indian Student) हा व्हिडीओ बनवला आहे. पोलंड आणि हंगेरीच्या सीमेवर काही सैनिक भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे विद्यार्थी मदतीसाठी गेले असताना त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याने आता पालकांचीही चिंता वाढली आहे.

सैनिक रस्त्यावर बसलेल्या विद्यार्थिनींसोबत मारहाण करत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांच्या किंचाळण्याचा आवाज स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. युद्धाचा आज पाचवा दिवस असून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतासह इतर देशांतील विद्यार्थ्यांचा त्रास वाढतच चालला आहे. विद्यार्थी त्यांच्या देशाच्या दूतावासाकडे सतत त्यांच्या देशात परत जाण्याची मागणी करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com