Atique Ahmed News : गॅंगस्टार अतिक अहमद १२०० कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक : कोण असणार वारस...?

उत्तर प्रदेशमधील गॅंगस्टार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना प्रयागराजमधील कसारी-मासारी स्मशानभूमीत कडक सुरक्षा व्यवस्थेत दफन करण्यात आले.
Atique Ahmed
Atique Ahmed Sarkarnama
Published on
Updated on

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील (UP) गॅंगस्टार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना प्रयागराजमधील कसारी-मासारी स्मशानभूमीत कडक सुरक्षा व्यवस्थेत दफन करण्यात आले. अतिकचा मुलगा असदसह कुटुंबातील इतर सदस्यांना ज्या ठिकाणी दफन करण्यात आले, त्याच ठिकाणी या दोन्ही भावांना दफन करण्यात आले आहे. दरम्यान, गॅंगस्टार अतिक अहमद हा १२०० कोटींच्या मालमत्तेचा मालक होता, असे सांगितले जाते. अतिकच्या या संपत्तीचा वारसदार कोण आणि ती कोणाला मिळणार, याची चर्चा हेाताना दिसत आहे. (Gangstar Atique Ahmed owns 1200 crore property : Who will be the heir...?)

प्रयागराजमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना अतिक आणि अशरफ अहमद या दोन्ही भावांना गोळ्या (Firing) घालून ठार करण्यात आले. त्यांच्या शवविच्छेदन अहवालात आतिकला आठ गोळ्या लागल्याचे, तर अश्रफला सहा गोळ्या लागल्याचे म्हटले आहे.

Atique Ahmed
Atique Ahmed Murder Case : अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडण्यासाठी पिस्तूल देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

प्रयागराज आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात अतिकची सुमारे चार दशके चलती होती. या काळात त्याने अमाप संपत्ती कमावली आहे. माध्यमांतील अहवालानुसार, अतिक हा १२०० कोटींच्या मालमत्तेचा मालक होता. मात्र, हा आकडा यापेक्षा खूप मोठा असू शकतो. यात अनेक बेनामी आणि बेकायदेशीर मालमत्तांचाही समावेश आहे.

असद आणि गुलामच्या एन्काउंटरपूर्वी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अतिक आणि त्याच्या अनेक जवळच्या मित्रांच्या घरांवर छापे टाकले आहेत. या छाप्यात तपास यंत्रणेने १५ ठिकाणांहून बेनामी आणि बेकायदेशीर संपत्तीची १०० हून अधिक कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय प्रयागराज आणि लखनऊच्या पॉश भागातही त्याची मालमत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. ती एकतर अतिक किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असू शकते.

Atique Ahmed
Atique Ahmed's Last Letter: अतिकने लिहिलेले शेवटचे पत्र सर्वोच्च न्यायालयाकडे पाठविले; पत्रात काही बड्या नेत्यांची नावे?

सध्या अतिकची पत्नी शाइस्ता परवीन फरारी आहे. ती अतिकच्या अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हती. त्याचा मुलगा असद हा चकमकीत मारला गेला आहे. दोन मुले बालसुधारगृहात आहेत. अवैध आणि बेनामी मालमत्तेची काळी गुपिते अतिक आणि अश्रफ यांच्याबरोबरच गेली आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्र आणि प्राप्तीकराच्या कागदपत्रांमध्ये अतिकने आपले उत्पन्न खूपच कमी दाखवले होते.

दादागिरीच्या जोरावर अतिकने अत्यंत कमी दरात मालमत्ता खरेदी केल्या होत्या. दस्तांमध्ये जी रक्कम दाखवण्यात आली आहे, ती भरलेली नाही. अतिकने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा केला आहे. यामध्ये प्रयागराजचे व्यापारी दीपक भार्गव आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजीव अग्रवाल यांनी त्यांना मदत केली.

Atique Ahmed
Sambhajiraje's offer to Abhijeet Patil : संभाजीराजेंची अभिजीत पाटलांना ऑफर : ‘तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची...’

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात आतिकच्या कुटुंबीयांची अद्याप चौकशी केलेली नाही. त्यांनी गरीब आणि असहाय लोकांच्या जमिनी त्यांना धाक दाखवून हडप केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. जी जमीन विकत घेतली, ती गुन्हेगारीच्या कमाईतून घेतल्याचे सांगितले जाते. अतिकची पत्नी आणि इतर दोन मुलांची ईडी चौकशी करू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com