Jitendra Awhad News : '...म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन करा’, राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी

Inauguration of Ram Temple : मंदिराच्या उद्घाटनावरुन सरकारवर टीका; राज्य आणि देशाच्या राजकारणातील सध्याच्या अनेक घडामोडींवर प्रतिक्रिया
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad News : देशात येत्या 22 जानेवारीला मोठ्या उत्साहात होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाला विरोधी पक्षातील नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नाही. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे. तर देशाच्या द्रौपदी मुर्मू या दलित आहेत, त्यांच्याच हस्ते राम मंदिराचे उद्घाटन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राज्यासह देशात सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट झाली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटीबाबत जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारण्यात आला. “दोघांनाही एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो.

Jitendra Awhad
Konkan Politics : रत्नागिरीत ठाकरेंना मोठा धक्का बसणार? 'हा' बडा नेता भाजपच्या वाटेवर

मनसे युतीत शामिल होईल का नाही याच्याशी मला काही देणेघेणे नाही. मी दुसऱ्याच्या घरात डोकवत नाही”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. “आमंत्रण देणारे हे कोण ? हे काय मंदीराचे मालक झालेत का ? रामाचा 7/12 काय यांच्या बापाच्या नावावर आहे का ? राम पूर्ण देशांचा आहे. राम हा शब्द प्रत्येकाच्या मनात आहे. हे रामचे जे मार्केटींग करतात ना, ते निवडणूका आल्याकी त्यातील हा प्रकार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुम्ही कोण राम मंदीराचे निमंत्रण देणारे? आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही अयोध्येत जाणार, छाती ठोकपणे जाणार. हीच ती लोकं आहेत ज्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला विरोध केला”,अशा शब्दात आव्हाड यांनी टीका केली. आव्हाड म्हणाले, “तुम्ही महात्मा फुलेंना मारण्याचाही प्रयत्न करणार, तुम्ही शाहू महाराजांच्या हत्येची सुपारीही देणार, तुम्ही आंबेडकरांना शाळेच्या बाहेर बसून शिकायला लावणार, त्याच आंबेडकरांना मनुस्मृती जाळून स्त्रीयांच्या सन्मान केला.

राम मंदीराचे (Ram Mandir) तुम्ही मालक नाहीत आणि राम तुमचा नाही. राम मंदीराचे उद्घाटन करायचे असेल तर राष्ट्रपती दलित महिला आहेत, त्यांच्या हस्ते करा. नवीन पार्लमेंटच्या पुजेला एकाही महिलेला निमंत्रण दिले नाही. देशातून जातीवाद कधी संपणार? आमंत्रणाचे काय नाटक आहे? आम्ही रामाचे दर्शन घ्यायला जाणार, बघू आम्हाला कोण थांबवतं ते, या देशात आता रामाच्या दर्शनापासून आम्हाला वंचित ठेवू शकत नाही. आमचा बाप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर.”

“ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट होईल आणि जागावाटपाबाबत चर्चा करतील. त्यांनी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करुन घ्यावं ही विनंती”, अशी भूमिका आव्हाड यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत सुरु असलेल्या चर्चांवर मांडली.

Jitendra Awhad
Karnatak BJP Politics : कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' राहिले दूरच,भाजपच्याच मागे लागला भ्रष्टाचाराचा भुंगा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com