LPG Cylinder
LPG CylinderSarkarnama

LPG Cylinder Price : पाच राज्यांमध्ये मतदान होताच सिलिंडरच्या महागाईचा भडका; नवे दर काय?

LPG Cylinder Price Hike : स्वयंपाक घरातील सिलिंडरचा काय आहे दर...
Published on

Delhi News : पाच राज्यांच्या निवडणुका संपताच एलपीजी गॅस सिलिंडर एका झटक्यात महागले आहेत. आजपासून म्हणजेच 1 डिसेंबर 2023 पासून देशभरातच एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहेत. नुकतंच पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं.

यानंतर आता राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सिलिंडरची किंमत 1819 रुपये आणि मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये 1804.5 रुपये झाली आहे. हैदराबाद, तेलंगणामध्ये आजपासून 19 किलोच्या सिलिंडरचा दर 2024.5 रुपयांपर्यंत वाढला आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्येही तो 2004 रुपये झाला आहे. (Latest Marathi News)

LPG Cylinder
Satara Political News : अभिजित बिचुकलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 500 रुपयांत घरगुती सिलिंडर द्या...

महागाईचा हा झटका मुख्यत: व्यावसायिक सिलिंडरच्या ग्राहकांनाच बसला आहे. ही दरवाढ 19 किलोच्या व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरमध्ये झाली आहे, तर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. त्यामुळे त्यांना यापासून दिलासा मिळाला आहे.

आज 19 किलो एलपीजी सिलिंडरचे दर 21 रुपयांनी वाढले आहेत. आजपासून दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1775.50 रुपयांऐवजी 1796.50 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये ते 1885.50 रुपयांऐवजी 1908.00 रुपयांना उपलब्ध असेल, तर मुंबईत रु. 1728.00 ऐवजी 1749 रुपये असणार आहे. चेन्नईमध्ये त्याची किंमत 1942 रुपयांऐवजी 1968.50 रुपये असेल.

LPG Cylinder
BJP Manifesto : 500 रुपयांत गॅस सिलिंडर, विवाहित महिलांना 12 हजार रुपये; छत्तीसगडच्या जाहीरनाम्यात भाजपनं...

घरगुती सिलिंडरचा दर काय?

यामध्ये 14.2 किलोचे वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज घरगुती प्रकारच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, 30 ऑगस्ट रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरची किमतीमध्ये तब्बल 200 रुपयांनी घट करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आजही 14.2 किलोचे घरगुती एलपीजी सिलिंडर 30 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या दराने उपलब्ध आहेत. याचा दर दिल्लीत 903 रुपये, तर कोलकात्यात 929 रुपये आणि मुंबईत 902.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये आज म्हणजेच 1 डिसेंबर 2023 रोजी 918.50 इतका दर आहे.

(Edited By - Chetam Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com