Gautam Adani Bribery Case : अदानी लाच प्रकरणात मोठा ट्विस्ट; देशातील बड्या वकिलांची फौज मैदानात

Adani bribery case latest updates and major twist: अमेरिकेत गौतम अदानी व इतर काही जणांवर फसवणूक व लाचप्रकरणी खटला दाखल करण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती.
Gautam Adani
Gautam AdaniSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर इतर काही जणांवर अमेरिकेत दाखल खटला प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपन्याच्या वतीने देशात नामांकित वकिलांनी बाजू मांडताना कंपनीवर लाच दिल्याचे कसलेही आरोप नसल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.

देशातील बड्या वकिलांपैकी एक असलेले माजी अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी एका पत्रकार परिषदेत कंपनीवरील आरोप फेटाळून लावला आहे. आरोपपत्रात अदानींवर लाच दिल्याचे आरोप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, मी अदानी ग्रुपचा प्रवक्ता म्हणून बोलत नाही. या संपूर्ण खटल्यात पाच आरोप आहेत. त्यामध्ये कलम एक आणि पाच सर्वात महत्वाच आहेत. दोन्हीतही गौतम अदानी आणि त्यांच्या भाचे सागर अदानी यांच्यावर आरोप नाहीत.

Gautam Adani
Dhananjay Chandrachud : संजय राऊतांच्या आरोपाला धनंजय चंद्रचूड यांचेही सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...

अमेरिकी भ्रष्टाचार प्रॅक्टिस कायद्यानुसार दोघांवरही आरोप नाहीत. भारतातील भ्रष्टाचार निवारण कायद्याप्रमाणे हा कायदा आहे. कलम पाच अंतर्गत करण्यात आलेले आरोप या दोघांवर नसून काही विदेशातील लोकांवर असल्याचे रोहतगी यांनी स्पष्ट केले आहे. अदानी यांच्यावतीने भारतीय संस्थाना लाच दिल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे. पण त्यात एकाचेही नाव किंवा विभाग नाही, असा दावा रोहतगी यांनी केला आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनीही या प्ररणावर आपली मत मांडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आरोपत्रात भारतातील लाचखोरीचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. केवळ लाच देण्याचे षडयंत्र रचण्यात आले, हेच आरोप आहेत. भारतात कायद्याचे उल्लंघन झाल्याचा कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही.

Gautam Adani
Rahul Gandhi : मोदी सरकार राहुल गांधींना दणका देणार? न्यायालयाचा 'तो' आदेश, गृहमंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

संसदेत आजही हंगामी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहात अदानी प्रकरणावरून विरोधकांनी हंगामा केला. या प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. त्यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तर राज्यसभेचे कामकाज सकाळी 11.30 पर्यंत स्थगित करण्यात आले. जेठमलानी यांनी काँग्रेसकडून होत असलेल्या जेपीसीच्या मागणीवरही भाष्य केले. काँग्रेसकडे लाचप्रकरणाचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे जेपीसी होऊ शकत नाही. त्यांनी पुरावे आणावेत किंवा हंगामा बंद करावा, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com