Modi Government : अमेरिकेकडून आम्हाला..! अदानी प्रकरणावर मोदी सरकारकडून पहिल्यांदाच मोठा खुलासा

Gautam Adani Bribery Case Ministry of External affairs America Court Energy Projects in India : अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील कोर्टात फसवणूक व लाचेच्या आरोपाखाली खटला दाखल करण्यात आला आहे.
Gautam Adani, Narendra Modi
Gautam Adani, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : उद्योगपती गौतम अदानी कथित लाच प्रकरणावरून विरोधकांकडून संसदेत दररोज गदारोळ घातला जात आहे. त्यामुळे चार दिवसांत केवळ 40 मिनिटेच कामकाज होऊ शकले. त्यानंतर आता मोदी सरकारकडून या प्रकरणावर पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे पव्रक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका स्पष्ट केली. अदानी प्रकरणाबाबत अमेरिकेकडून भारत सरकारला आधी काहीच माहिती देण्यात आलेली नाही, असे त्यांनी सांगितले. हे प्रकरण खासगी कंपनी, व्यक्ती आणि अमेरिकी न्याय विभागाशी संबंधित कायदेशीर प्रकरण आहे. अशा प्रकरणांमध्ये निश्चित प्रक्रिया आणि कायदेशीर मार्ग आहेत. या कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले जाईल, असे आम्हाला वाटते, असेही जयस्वाल म्हणाले.

Gautam Adani, Narendra Modi
Assembly Election Results : महाराष्ट्रातील आकडे बदलणार? काँग्रेसनं केलं मोठं काम, आता निर्णय आयोगाच्या हाती

अदानी यांच्याविरोधात अमेरिकेतील कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्याचा दावाही केला जात आहे. यावर बोलताना जयस्वाल म्हणाले, समन्स किंवा अटक वॉरंट ची अंमलबजावणीसाठी कोणत्याही विदेशी सरकारकडून करण्यात आलेली कोणतीही विनंती आपआपसांतील कायदेशीर सहकार्याचा भाग असतो. अशा विनंतीची गुणदोषांच्या आधारे चौकशी केली जाते. सध्यातही आम्हाला या प्रकरणी अमेरिकेकडून कोणतीही विनंती प्राप्त झालेली नसल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अदानी ग्रीन कंपनीकडून लाचखोरीचे आरोप फेटाळून लावण्यात आले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ मेहश जेठमलानी यांनी अमेरिकेत दाखल खटल्यात अदानींवर लाचखोरीचे आरोप नसल्याचा दावा केला आहे. काँग्रेसने आरोप करताना पुरावे द्यावेत, पुरावे नसतील तर गोंधळ घालू नये, असेही जेठमलानी यांनी म्हटले होते.

Gautam Adani, Narendra Modi
Gautam Adani Bribery Case : अदानी प्रकरण संसदेत काँग्रेसच्या अंगलट; मित्रपक्षांनी सोडली साथ...

संसदेत काँग्रेस आक्रमक

अदानी प्रकरणावरून काँग्रेसने संसदेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या चार दिवसांत पक्षाच्या खासदारांकडून या प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, दोन्ही सभागृहात त्यांची मागणी फेटाळली जात असल्याने खासदारांकडून घोषणाबाजी केली जात आहे. परिणामी दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com