Gautam Adani Bribery Case : अदानी प्रकरण संसदेत काँग्रेसच्या अंगलट; मित्रपक्षांनी सोडली साथ...

Parliament Winter Session Congress Mamata Banerjee Samajwadi Party : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांकडून लोकसभेसह राज्यसभेत गौतम अदानी लाच प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली जात आहे.
Rahul Gandhi, Gautam Adani
Rahul Gandhi, Gautam AdaniSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : अमेरिकेतील न्यायालयात उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील कथित लाच व फसवणुकीच्या खटल्यावरून काँग्रेसने रान उठवले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवसापासून काँग्रेससह इतर विरोधकांकडून दोन्ही सभागृहात जोरदार हंगामा केला जात आहे. त्यामुळे दररोज कामकाज तहकूब करावे लागत आहे. पण आता काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेत अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार, हे स्पष्ट दिसत होते. तसेच चित्र पहिल्या दिवसापासून दिसत आहे. पण आता संसदेतील विरोधकांचा आवाज क्षीण होणार असल्याचे चिन्ह आहे.

Rahul Gandhi, Gautam Adani
Hemant Soren Decision : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी वेटिंगवर, तिकडं सोरेन यांचा धडाका सुरू; महिलांना दिलं मोठं गिफ्ट

अदानी किंवा काँग्रेसकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या कोणत्याही मुद्द्याला महत्व न देण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने घेतला आहे. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्षाही अदानी प्रकरणावरून काँग्रेसला फारशी मदत करण्याच्या तयारी नसल्याचे दिसते. समाजवादी पक्षाकडून उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतच सरकारला घेरण्यावरून फूट पडल्याचे चित्र दिसत आहे.

अदानी प्रकरणावरून राहुल गांधी यांचा आवाज क्षीण झाल्याचे दिसत आहे. बंगाल सरकारला केंद्र सरकारकडून न मिळालेल्या निधीबाबत तृणमूल काँग्रेसचे खासदार अधिक जोर देणार आहेत. तर केरळमध्ये सत्तेत असलेले डाव्या पक्षाचे खासदारही अदानी प्रकरणाला फारसे महत्व देताना दिसत नाही. केरळ सरकारने अदानींसोबत काही प्रकल्प हाती घेतले आहेत.

Rahul Gandhi, Gautam Adani
Raj Kundra Pornography Case : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा ED च्या कचाट्यात; घरासह कार्यालयावर रेड

अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून दोन्ही सभागृहांचे कामकाज काही मिनिटांतच तहकूब करावे लागत आहे. यामुळे टीएमसी, द्रमुक, डावे, आरजेडी या इंडिया आघाडीतील पक्षांच्या खासदारांमध्ये नाराजी असल्याचे समजते. महाराष्ट्रातील पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागल्याने अदानी मुद्दा उपस्थित केला जात असल्याचा दावाही काही नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे इतर पक्षांकडून काँग्रेसला अपेक्षित साध मिळताना दिसत नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात काँग्रेसकडूनही मवाळ भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com