Gen-Z Protests Mexico : सोशल मीडियावरील बंदी आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात नेपाळमध्ये सुरू झालेल्या जेन-झी आंदोलनामुळे तिथे सत्तांतर झालं होतं. तरूणाईच्या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला होता.
नेपाळ प्रमाणेच बांगलादेश मध्येही जेन-झी आंदोलकांनी सत्तांतर घडवून आणलं. ही उदाहरणं ताजी असतानाच आता मेक्सिकोमधील जेन-झी तरुणाई रस्त्यावर उतरली असून त्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे.
शनिवारी (ता.15) मेक्सिको सिटीच्या रस्त्यावर अचानक हजारो तरूण जमले. त्यांनी हातात विविध बॅनर्स घेत सरकार विरोधी घोषणाबाजी करायला सुरूवात केली. या तरूणांनी मेक्सिकोमधील वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचारावरून सरकारविरोधात आंदोलन पुकारलं आहे.
या जेन-झी आंदोलनात विरोधी पक्षांती नेते आणि वयस्कर लोक देखील आता सहभागी झालेत. तर पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातल्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
त्यानंतर संतापलेल्या आंदोलकांनी थेट पोलिसांवर हल्ला केल्यामुळे तिथलं वातावरण हाताबाहेर गेलं. दरम्यान, लाठीमार करत पोलिसांनी जमावाला पांगवलं आहे. तर आंदोलनापूर्वी मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लाउडिया शेनबॉम यांनी प्रतिक्रिया दिली होती.
यावेळी त्यांनी उजव्या विचारसरणीचे पक्ष जेन-झी आंदोलनाच्या माध्यमातून हिंसा करण्याचा प्रयत्न करत देशातील घुसखोरीला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, आता नेपाळ आणि बांगलादेशमधील जेन-झी आंदोलनामुळे मेक्सिकोमधील आंदोलन देखील देशभरात चर्चेचा विषय बनलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.