BRS Merger in Sharad Pawar NCP: BRS गाशा गुंडाळणार...; शरद पवारांच्या NCP मध्ये विलीन होणार?

BRS in Speculations of Merger with Sharad Pawar’s NCP : लोकसभा निवडणुकीच्या आधी मराठवाड्यातून महाराष्ट्रात एन्ट्री केलेले 'गुलाबी वादळ' म्हणजे भारत राष्ट्रसमिती म्हणजे बीआरएस पक्ष (BRS) आता गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे.
BRS Merger in Sharad Pawar NCP
BRS Merger in Sharad Pawar NCPSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचा अवघी शिल्लक राहिल्याने उमेदवारीसाठी अनेकांची लगबग सुरू झाली आहे. काही दिवसात राज्यातील राजकारणात आपल्याला मोठे बदल झालेले पाहायला मिळणार आहे.

अशातच लोकसभा निवडणुकीच्या आधी मराठवाड्यातून महाराष्ट्रात एन्ट्री केलेले 'गुलाबी वादळ' भारत राष्ट्रसमिती म्हणजे बीआरएस पक्ष (BRS) आता गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. बीआरएसचे नागपूर येथील प्रदेश कार्यालयाला टाळे टोकण्यात येणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काल (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. हे पदाधिकारी लवकरच शरद पवार यांना साथ देऊन त्यांच्या पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

तेलंगणातील सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष असलेल्या brsची गेल्या दोन निवडणुकांमध्ये पिछेहाट झाली आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही पक्षाचा सपाटून पराभव झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातील काही बड्या नेत्यांनी बीआरएसची वाट धरली होती, पण काही महिन्यात त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएसचा महाराष्ट्रातून सुपडा साफ होण्याचे चित्र आहे.

BRS Merger in Sharad Pawar NCP
Devendra Fadnavis: लोकसभेत वोट जिहाद, देवेंद्र फडणवीस यांचा रोष कोणावर ?

नांदेड हा तेलंगणातील राजकीय पक्षांसाठी लाँचिंग पॅड ठरत असल्याचे बोलले जाते. हैदराबाद-नांदेड मार्गे महाराष्ट्र असा एमआयएमने राज्यात विस्तार झाला. तसाच बीआरएसने नांदेडमार्गे महाराष्ट्रात एन्ट्री केली होती.

भौगोलिक, भाषिक जवळीकता असल्याने पक्षाचा विस्तार होण्यासाठी याचा कित्ता गिरवत भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाच्या लाँचिंगसाठी नांदेडची भूमी निवडली होती, पण त्यांना अपयश आले.

BRS Merger in Sharad Pawar NCP
Maharashtra Swarajya Party: संभाजीराजेंच्या 'स्वराज्य' संघटनेला 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' म्हणून मान्यता

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नापिकी, सततचा दुष्काळ या प्रश्नावर काम करण्याची भरपूर संधी असल्याचे लक्षात येताच चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाला विस्तारण्यासाठी लगतच्या नांदेड आणि महाराष्ट्राची निवड केली होती.

पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध भागात फिरून पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडली. इतर पक्षांतील नाराज पदाधिकारी कार्यकर्त्यांना हेरून पक्षात प्रवेश दिले, त्याचे सोहळेही साजरे केले, पण काही महिन्यात बीआरएस पक्षाला महाराष्ट्रात घरघर लागली. अनेकांनी बीआरएस सोडून घरवापसी केली. राहिलेले काही नेते, पदाधिकारी आता पक्षाला रामराम ठोकण्याच्या विचारात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com