Vishwajeet Rane meet PM Modi : मंत्री विश्वजीत राणेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; गोव्यात राजकीय चर्चांना आले उधाण!

Goa Health Minister Vishwajeet Rane News : विश्वजीत राणे हे गोव्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते असून त्यांचा मंत्रीमंडळ फेररचनेत मोलाचा वाटा असू शकतो, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे
Vishwajeet Rane meet PM Modi
Vishwajeet Rane meet PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Goa Minister Vishwajeet Rane News : गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीने गोव्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या शक्यतेवर आधीपासूनच चर्चा सुरू होती आणि या भेटीमुळे त्या चर्चांना अधिक गती मिळाल्याचे मानले जात आहे.

विश्वजीत राणे हे गोव्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते असून त्यांचा मंत्री मंडळ फेररचनेत मोलाचा वाटा असू शकतो, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. गोव्यातील भाजपच्या अंतर्गत धोरणे आणि आगामी योजना यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही भेट केवळ सौजन्यभेट होती की आगामी राजकीय हालचालींचा भाग, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, गोव्याच्या राजकारणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

याबाबत राणे यांनी अत्यंत मर्यादित अशी माहिती एक्सवर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'मला पंतप्रधान, माझे गुरू नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांची भेट घेण्याचा सन्मान लाभला. एक नम्र भाजप कार्यकर्ता म्हणून, त्यांच्या परिवर्तनशील दृष्टिकोन आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठीच्या अखंड प्रयत्नांतून मला अपार प्रेरणा मिळते.'

Vishwajeet Rane meet PM Modi
Rahul Gandhi : नव्या फौजदारी कायद्यातील ‘या’ 6 गंभीर कलमांच्या कचाट्यात राहुल गांधी अडकणार?

साध्या पार्श्वभूमीतून भारताच्या विकासकथेला नेतृत्व करणाऱ्या त्यांच्या प्रवासाने माझ्या हृदयाला खोलवर स्पर्श केला आहे. लोकांशी असलेले त्यांचे आत्मीय नाते आणि त्यांचे उबदार व्यक्तिमत्त्व प्रत्यक्ष अनुभवताना त्यांच्या नेतृत्वाविषयी असलेली माझी प्रशंसा अधिकच दृढ झाली

Vishwajeet Rane meet PM Modi
Sunil Tatkare on Dilip Walse Patil : राष्ट्रवादीने दिलीप वळसे पाटलांना मंत्रिपदापासून दूर का ठेवलं? ; प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले...

तसेच, 'राष्ट्र प्रथम आणि विकसित भारत या त्यांच्या तत्त्वज्ञानाने केवळ धोरणांमध्ये बदल केला नाही, तर लाखो भारतीयांमध्ये नवचैतन्य, अभिमान आणि उद्देश निर्माण केला आहे. त्यांच्याशी झालेल्या या वैयक्तिक संवादाने पक्षासाठी आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी अधिक मेहनत करण्याचा माझा निर्धार अधिक बळकट केला आहे.' असे त्यांनी एक्सवर म्हटले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com