Sunil Tatkare on Dilip Walse Patil : राष्ट्रवादीने दिलीप वळसे पाटलांना मंत्रिपदापासून दूर का ठेवलं? ; प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले...

Cabinet Expansion and Dilip Walse Patil : राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपाल पदाबाबत काही ऑफर मिळाली आहे का? , जाणून घेऊयात तटकरे यांनी नेमकं काय सांगितलं आहे.
Sunil Tatkare on Dilip Walse Patil
Sunil Tatkare on Dilip Walse PatilSarkarnama
Published on
Updated on

NCP Sunil Tatkare News : राज्यात सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख घटक पक्षांपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज साम टीव्हीला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर सविस्तर उत्तरंही दिली. याचदरम्यान महायुतीच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना स्थान का दिलं गेलं नाही? यावरही प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पक्षाची भूमिका माडंली.

कोणत्याही प्रकारचा नावावर डाग नाही, भ्रष्टाचाराचा आरोप नाही, तुरुंगात गेलेले आहेत अशा स्वरुपाचाही कोणताही डाग नसलेला नेता म्हणजे दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) होते. त्यांना तुम्ही मंत्रिमंडळापासून दूर का ठेवले? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कारण, ते ज्येष्ठ नेते आहेत, शरद पवारांसोबत काम केलेलं आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना दूर ठेवणं याचं उत्तर काय मिळताना दिसलं नाही.

या वरील प्रश्नावर बोलताना तटकरे(Sunil Tatkare) म्हणाले, ''त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आदर आम्हाला सगळ्यांच आहे. पण शेवटी नवीन नेतृत्व जेव्हा महाराष्ट्रात तयार करायचं असतं, आम्हाला सहभागमधील मंत्र्यांची संख्या मर्यादित आहे. 9+1 अशावेळी नवीन चेहरे आणले तर त्याचाही उपयोग पक्षाच्या बांधणीसाठी होतो.''

Sunil Tatkare on Dilip Walse Patil
Sunil Tatkare Video : नाराज छगन भुजबळ यांच्यासाठी अजितदादांकडे 'प्लॅन बी', सुनील तटकरेंनी सगळच सांगून टाकलं

तसेच ''दिलीप वळसे पाटलांचा विधिमंडळ कामकाजाचा, मंत्रिपदाचा, विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाजाचा, संघटन कौशल्याचा प्रदीर्घ अनुभव, उद्याच्या काळात आम्ही नक्कीच अशा पद्धतीने उपयोग करून घेवू. की, महाराष्ट्रात आगमी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची(NCP) प्रभावीपणाची भूमिका राहिलेली पाहायला मिळेल. राष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्याने काम केलं आहे.'' असंही तटकरेंनी सांगितलं.

Sunil Tatkare on Dilip Walse Patil
Mahayuti News : मुश्रीफ नवव्यांदा, आबिटकर पहिल्यांदा मंत्री; कोल्हापूरकरांकडून स्वागताची जय्यत तयारी

याशिवाय तुम्ही त्यांना राज्यपाल बनवणार आहात, अशीही चर्चा होती? तुम्हाला राज्यपाल पदाचा केंद्राकडून कोटा मिळालेला आहे का? यावर तटकरे म्हणाले, ''नाही.. नाही.. हे सगळं तथ्यहीन आहे. या संदर्भात कधीही भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाशी आमची चर्चा कधीही झालेली नाही.'' असं तटकरेंनी यावेळी स्पष्ट केलं

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com