South Goa Election Results 2024 : भाजपच्या श्रीमंत उमेदवाराला काँग्रेसच्या कॅप्टनने पाजले पाणी, कॅप्टन विरियातो फर्नांडिस विजयी

Viriato Fernandes Vs Pallavi Dempo : विरियातो यांना 2 लाख 15 हजार 672 एवढी मते मिळाली तर भाजपच्या पल्लवी धेंपे यांना 2 लाख 969 एवढी मते मिळाली आहेत.
Viriato Fernandes Vs Pallavi Dempo
Viriato Fernandes Vs Pallavi DempoSarkarnama

Congress Viriato Fernandes Wins South Goa Seat : भाजपच्या श्रीमंत उमेदवाराला काँग्रेसने पाजले पाणी, दक्षिण गोव्यात काँग्रेसचा उमेदवार विजयी पल्लवी धेंपे या होत्या. त्यांची आणि पतीची मालमत्ता मिळून 1400 कोटी रुपयांची आहे. येथून काँग्रेसच्या विरियातो फर्नांडिस यांना काँग्रेस उमेदवारी दिली होती. ते येथून 14 हजार 703 मतांनी विजय झाला आहे.

विरियातो यांना 2 लाख 15 हजार 672 एवढी मते मिळाली तर भाजपच्या पल्लवी धेंपे यांना 2 लाख 969 एवढी मते मिळाली आहेत. पल्लवी यांच्या रुपाने पहिला महिला खासदार गोव्यात मिळणार याची चर्चा होती. मात्र, विरियातो यांनी पहिल्याच फेरीपासूनच आघाडी घेतली. दोघांमध्ये लीडसाठी काटे की टक्कर होती. मात्र, विरियातो यांनी 14 हजार मतांनी पल्लवी यांना पराभूत केले.

Viriato Fernandes Vs Pallavi Dempo
Chandrabapu Naidu Loksabha Result Analysis : जगनमोहनचा धुव्वा उडवला, विधानसभेत स्वबळावर बहुमत, आता चंद्राबाबूंकडे 'इंडिया'चे लक्ष

धेंपे यांचे गोव्यात एक वलय आहे. त्यामुळे भाजपने त्यांच्या उमेदवारीला पसंती दिली.काँग्रेसने Congress विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्याऐवजी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना उमेदवारी दिली. विरियातो यांच्या उमेदवारीचे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांकडून देखील स्वागत करण्यात आले.

मित्रपक्षांची मिळाली साथ

दक्षिण गोव्यात भाजपला सहज विजय मिळेल, अशी चर्चा होती.मात्र काँग्रेस उमेदवारविरियातो यांच्या प्रचारासाठी गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाई, आपचे वेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा याशिवाय इतर नेत्यांनी मोठी मेहनत घेतली.भाजपने दिग्गज नेते, मंत्री दक्षिण गोव्यात उतरले होते. मात्र, अल्पसंख्याक समाज हा काँग्रेस सोबत कायम राहिल्याने त्यांनी हा विजय मिळवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com