Goa Politics : देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर मंत्रिमंडळात बदल अटळ, गोव्यात चार मंत्र्यांची गच्छंती?

Digambar Kamat CM Pramod Sawant Devendra Fadnavis : गोवा मंत्रिमंडळातील बदल हे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित आहे.
DCM Devendra Fadnavis
DCM Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Goa Politics : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच गोव्याला भेट दिली. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. मात्र, नड्डा गोव्याला न जाता फडणवीस यांनी गोव्याला भेट दिली.

विधानसभा अधिवेशनात गोवा सरकार विधेयके मागे घ्यावी लागली. या प्रकरणांची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली असून किमान चार जणांची गच्छंती अटळ असून दिगंबर कामत यांचा मंत्रिमंडळात प्रवेश सुकर होईल, अशी माहिती 'गोमंतक'ला सुत्रांनी दिली आहे.

विधानसभा अधिवेशनानंतर मंत्रिमंडळात बदल होईल, अशी अपेक्षा मायकल लोबो, संकल्प आमोणकर आणि दिगंबर कामत यांना होती. मात्र त्यांची चतुर्थी मात्र फारशा उत्साहाविना जाण्याची शक्यता नाही. कारण मंत्रिमंडळातील बदल हे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित आहे.

DCM Devendra Fadnavis
Sharad Pawar : पांडुरंगाच्या दर्शनावर शरद पवार, म्हणाले,' 'गाजावाज,नाटक करतं... '

...तर सारस्वत मंत्र्यावर गदा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळातील सामजिक समतेल राखण्यासाठी कामत यांना मंत्रिमंडळात घ्यायचे असेल तर एखाद्या सारस्वत मंत्र्यावर गदा येण्याची शक्यता आहे. कामत यांच्या समावेशानंतर उच्च समाजाचे मंत्रिमंडळात अस्तित्व २५ टक्क्यांवर पोहोचते.

खंवटे-फडणवीस यांचे ‘गुफ्तगू’

मंत्री रोहन खंवटे यांच्या पर्यटन विधेयकाचा वाद दिल्लीतही पोहोचला आहे. या विषयावर भाजपच्या सुकाणू समितीच्या बैठकीतही खडाजंगी झाली. भाजप मुख्यालयाच्या कोनशिला कार्यक्रमासाठी गोव्यात आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आज पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काही विषयांवर चर्चा केली असल्याची चर्चा आहे.

DCM Devendra Fadnavis
Narendra Modi News : शिंदे, फडणवीस, अजित दादांसमोरच पीएम मोदींनी फुंकले विधानसभेचे रणशिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com