Karnataka News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांविरोधात बेंगलुरू पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तिकीटासाठी एका महिलेकडून अडीच कोटी रुपये घेऊन फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
प्रल्हाद जोशी हे केंद्रात कोळसा मंत्री आहे. त्यांचे बंधू गोपाळ जोशी, बहीण विजयालक्ष्मी आणि पुतण्या अजय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेडीएसचे माजी आमदार देवनंद फूल सिंह चव्हाण यांच्या पत्नी सुनीता चव्हाण यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. भाजपची उमेदवारी मिळवून देतो, असे सांगत पैसे घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तिकीट न मिळाल्याने पैसे परत मागल्यानंतर आतापर्यंत काहीच रक्कम परत केली नाही, असेही चौहान यांनी तक्रारीत म्हटले आहे. कर्नाटक लोकसभा निवडणुकीदरम्यान हा प्रकार घडला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याने प्रल्हाद जोशी यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कर्नाटकचे गृह मंत्री जी. परमेश्वर यांनी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस गोपाळ जोशी यांचा शोध घेत आहेत. त्यांना अटक केल्यानंतर याबाबत अधिक माहिती समजू शकेल. सध्या गोपाळ जोशी फरार आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर यामध्ये कुणाचा सहभाग होता, हे स्पष्ट होईल.
बेंगलुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी सांगितले की, ‘दोन कोटी रुपये टप्प्याटप्प्याने दिल्याचे दिसते. त्याचा तपास सुरू आहे.’ दरम्यान, प्रल्हाद जोशी यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शुक्रवारी बेंगलुरू येथील गांधी भवनसमोर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.