Kirodi Lal Meena : भाजपला धक्का; राजस्थानच्या कृषिमंत्र्यांचा सर्व पदांचा राजीनामा

Rajasthan Bhajanlal Government BJP Politics : किरोडी लाल मीणा हे पक्षातील ज्येष्ठ नेते असून त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे.
PM Narendra Modi, Kirodi Lal Meena
PM Narendra Modi, Kirodi Lal MeenaSarkarnama

Jaipur : राजस्थानचे कृषिमंत्री किरोडी लाल मीणा यांनी ‘प्राण जाई पर बचन न जाई…’ असं म्हणत मंत्रिपदासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. जयपूरमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी गुरुवारी ही घोषणा केली. त्यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.

भाजप नेते किरोडी लाल मीणा यांनी दहा दिवसांपुर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मुख्यमंत्री भजनलाल यांच्यासह पक्षातील नेत्यांकडून त्यांना राजीनामा मागे घेण्यासाठी विनवणी केली होती. मीणा यांनी माघार न घेता गुरूवारी राजीनामा दिल्याची अधिकृत घोषणा केली.

PM Narendra Modi, Kirodi Lal Meena
Rahul Gandhi : लोकसभेतील भाषण राहुल गांधींना भोवणार? केंद्रीय मंत्र्यांकडून कारवाईचे संकेत

लोकसभा निवडणुकीत मीणा यांना दौसा मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला. तसेच त्यांच्या प्रभावक्षेत्रातही भाजपच्या उमेदवारांचा परभाव झाला. निवडणुकीदरम्यान त्यांनी या भागात भाजपचा पराभव झाला तर पदाचा राजीनामा देईन, असे जाहीर केले होते. लोकसभेचा निकाल आल्यानंतर ते राजीनामा देणार, याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या.

निकालानंतर मीणा यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर राजीनाम्याबाबत सातत्याने निशाणा साधला जात होता. अखेर त्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, मीणा यांनी राजीनामा दिला असला तर अद्याप राज्यपालांनी राजीनामा स्वीकारलेला नाही.

मीणा यांनी एक्सवर पोस्ट करत ‘प्राण जाई पर बचन न जाई..’, असे म्हटले आहे. त्यामुळे आता ते माघार घेणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता भाजप त्यांच्याबाबतीत काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, मीणा हे राज्यसभेचे खासदार होते.

PM Narendra Modi, Kirodi Lal Meena
Om Birla : संसदेत शपथ घेतल्यानंतर 'जय हिंदू राष्ट्र' म्हणता येणार नाही; लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय!

विधानसभा निवडणुकीत सवाई माधोपूरमधून विजय मिळवल्यानंतर मीणा यांना मंत्रिपद मिळाले होते. यापूर्वी दोनदा लोकसभेचे खासदार होते. तसेच आतापर्यंत पाचवेळी विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतही होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com