हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप्ट कॅप्टन वरुण सिंग यांचे निधन

तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत कॅप्टन वरुण सिंग गंभीर जखमी झाले (Varun singh) होते.
Varun singh

Varun singh

Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग (Varun singh) यांचे निधन झाले आहे. दुर्घटनेत सिंग हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर बंगळुरु येथील कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते. या दुर्घटनेत संरक्षण दलांचे प्रमुख (CDS) जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर 12 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत सिंग हे एकटेच बचावले होते. आज (15 डिसेंबर) उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

<div class="paragraphs"><p>Varun singh </p></div>
कोण आहेत बिपीन रावत?

कुन्नूर येथे लष्कराचे MI17V5 हेलिकॅाप्टरचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण 14 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत वरुण सिंग गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. ज्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे सीडीएस बिपिन रावत व्याख्यानासाठी गेले होते. त्याच सुलूर हवाई तळावर वरुण सिंग विंग कमांडर म्हणून कार्यरत होते.

ग्रुप कॅप्टन सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली होती. त्यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत होती. मात्र, सिंग यांच्या तब्येतीत चढ-उतार होत आहे होता. ते सुमारे 45 टक्के भाजले होते. ते यावर मात करून बरे होतील, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र, अखेर त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे.

<div class="paragraphs"><p>Varun singh </p></div>
बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर दिग्दर्शकाने केली धर्मांतराची घोषणा; कारण...

वरुण सिंग हे एक बहादुर सैनिक होते. गेल्यावर्षी सिंग उड्डाण करत असलेल्या एका लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या सिस्टीममध्ये बिघाड झाली होती, त्यामुळे एअरक्राफ्टवरील नियंत्रण पूर्णपणे गमावले होते. मात्र, त्यांनी मोठ्या हिंमतीने विमान उतरवले होते. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्यचक्र प्रदान करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com