
BJP Leadership Plans Major Organizational Changes : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटले वगळता इतर सर्व मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. पटेल यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीतच मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे राजीनामे घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील घडामोडींनी वेग आला आहे.
मुख्यमंत्री पटेल यांच्या निवासस्थानी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांसह मंत्र्यांची बैठक झाली. केंद्रीय नेतृत्वाने सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्याचे आदेश दिल्याचे या बैठकीत नेत्यांनी मंत्र्यांना सांगितले. त्यानंतर सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री पटेल यांच्याकडे आपले राजीनामे सुपुर्द केल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री पटेल आज रात्रीच राज्यपालांना भेटून सर्व मंत्र्यांचे राजीनामे त्यांच्याकडे सोपवतील. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री पटेल हे मात्र पदावर कायम असल्याचेही समजते. याबाबत भाजप किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्री पटेल यांनी नुकताच दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यामध्येच मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. त्यानुसार आज मंत्र्यांनी राजीनामे दिले. शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. गांधीनगर येथील महात्मा मंदिरामध्ये शपथग्रहण समारंभ होणार असल्याचे समजते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथविधी होईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांच्याकडून मुख्यमंत्री पटेल यांना मंत्र्यांच्या राजीनाम्याचा निरोप आला होता. उद्या पटेल यांच्या मंत्रिमंडळात सर्व 16 नवे चेहरे असतील.
गुजरातमध्ये 2027 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये हा बदल केला जात असल्याची चर्चा आहे. पक्षसंघटन आणि सरकारमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. मंत्रिमंडळात नवे व तरूण चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. भविष्यातील राजकीय रणनीती अधिक मजबूत करण्याचा पक्षाचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.