Ram Mandir Ayodhya : राम मंदिराच्या मुद्यावरून काँग्रेस नेत्याचा आमदारकीचा राजीनामा

MLA CJ Chavda : आमदार छावडा यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला राजीनामा...
MLA CJ Chavda
MLA CJ ChavdaSarkarnama
Published on
Updated on

Gujarat News : अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे निमंत्रण मिळूनही काँग्रेसने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून गुजरातमधून नाराजीचा सूर उमटत आहे. काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आता पक्षाच्या या भूमिकेमुळे एका ज्येष्ठ नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचाही राजीनामा दिला आहे.

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आमदार सी. जे. छावडा (MLA CJ Chavda) यांनी शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा सोपवला. विजापूर विधानसभा (Assembly) मतदारसंघातून ते तीनवेळा आमदार झाले आहेत. राम मंदिराबाबत (Ram Mandir) पक्षाच्या भूमिकेमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

MLA CJ Chavda
Manoj Jarange March to Mumbai : सरकारच्या दारात मरण आले तरी बेहत्तर; आजपासूनच उपोषणाची मनोज जरांगेंची घोषणा

मीडियाशी बोलताना छावडा म्हणाले, मी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. मागील 25 वर्षे काँग्रेससाठी काम केले. अयोध्येतील राम मंदिरात होत असलेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे देशातील लोक आनंदित आहेत. या आनंदात सहभागी होण्याऐवजी पक्षाने वेगळीच भूमिका घेतली. त्यामुळे मी नाराज आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुजरातचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या कामाला, धोरणांना आम्ही मदत करायला हवी. पण काँग्रेसमध्ये असल्याने मला ते शक्य होत नाही. त्यामुळे राजीनामा दिल्याचेही छावडा यांनी स्पष्ट केले. छावडा यांच्याप्रमाणे पक्षातील इतर काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, छावडा यांच्या राजीनाम्यामुळे गुजरात विधानसभेतील काँग्रेसचे संख्याबळ १५ पर्यंत खाली आले आहे. छावडा हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याआधी चिराग पटेल यांनीही काही दिवसांपूर्वीच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठे धक्के बसू लागले आहेत.

R...

MLA CJ Chavda
Jagan Mohan Vs Sharmila : भाच्याच्या साखरपुड्यात जगनमोहन यांनी बहिणीकडं बघितलंही नाही; राजकीय वैर वाढलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com