Pune Crime: लई मस्ती आली का? चुपचाप पंचवीस लाख रुपये दे..: गणेश बिडकरांना धमकी

गेल्या आठवड्यात पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला होता.
Ganesh Bidkar
Ganesh Bidkar Sarkarnama
Published on
Updated on

Pune Crime : गेल्या आठवड्यात पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार ताजा असतानाच आता भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांनाही पंचवीस लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (BJP leader Ganesh Bidkar threatened with extortion of 25 lakhs)

बिडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रामनवमीच्या दिवशी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना व्हॉट्सॲप कॉल करून मराठी आणि हिंदी भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. "लई मस्ती आली का? चुपचाप पंचवीस लाख रुपये दे" अशी धमकी देत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.

Ganesh Bidkar
Muralidhar Mohol News: मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा वापर करुन मागितली तीन कोटींची खंडणी;असा केला प्लॅन

तसेच, पैसे नाही दिले तर तुझी बदनामी करू, असंही संबंधित अनोळखी व्यक्तीने बिडकर यांना सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून बिडकर यांची ओळख आहे. गणेश बिडकर यांनी या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे

दरम्यान, गेल्या आठवड्यातच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरून दोघा जणांनी व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी तीन कोटी रुपये द्या, अशी मागणी खंडणी खोरांनी केली होती. या प्रकरणी राजेश व्यास यांच्या तक्रारीवरुन संदीप पाटील, शेखर ताकवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com