Kurhani By Election Result 2022 : नितीश कुमार-तेजस्वी यादवांना भाजपचा धक्का ; गुप्ता विजयी

Kurhani By Election Result 2022 : केदार गुप्ता यांनी ७६६४८ मते मिळाली आहेत.
kurhani by election result 2022 kedar prasad gupta
kurhani by election result 2022 kedar prasad guptasarkarnama
Published on
Updated on

Kurhani By Election Result 2022 : बिहारच्या कुढनी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या मतदार संघात भाजप आणि जदयूमध्ये जोरदार रस्सीखेच होती.

भाजपचे उमेदवार केदार गुप्ता यांनी जेडीयूचे उमेदवार मनोज कुशवाहा यांचा ३६४५ मतांनी पराभव केला आहे. केदार गुप्ता यांनी ७६६४८ मते मिळाली आहेत.

kurhani by election result 2022 kedar prasad gupta
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेला गालबोट ; युवकाने स्वत:ला पेटवून घेतलं..

२०२०च्या विधानसभा निवडणुकीत कुढनी विधानसभेतून जदयूचे उमेदवार अनिल सहनी यांचा विजय झाला होता. भाजपचे उमेदवार केदार गुप्ता यांचा ७०० मतांनी पराभव झाला होता.

हा मतदारसंघ मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी महत्वपूर्व मानला जात होता. या निकालामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना मोठा धक्का समजला जातो.

त्यासाठी ही जागा राजदकडून जदयूने मागितली होती. त्यासाठी जदयूसाठी ही जागा प्रतिष्ठेची होती. जदयूच्या अनेक बड्या नेत्यांनी या मतदारसंघात प्रचार करुन ही जागा मिळविण्यासाठी कंबर कसली होती. मुकेश सहनी यांचा प्रभाव सहनी समाजात फारसा पडला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com