Gujrat Election 2022 : पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान : 788 उमेदवारांच्या भवितव्याचा होणार फैसला‍!

Gujrat Election : पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान : भाजप-काँग्रेस लढत, आपचाही प्रवेश!
Gujrat Election News
Gujrat Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Gujrat Election : गुजरात विधानसभेसाठी आज गुरुवार 1 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. एकूण 788 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये आज बंद होणार आहे. मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात हाईल. पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील जिल्ह्यांचा समावेश आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, दिव्यांगांसाठी किमान 182 आणि महिलांसाठी 1274 बूथ तयार करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण 25430 बूथ कार्यरत असतील. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यात मतदान करणाऱ्या 5,74,560 मतदारांचे वय 18 ते 19 वर्ष वयोगटातील आहे. याशिवाय 4945 मतदार आहेत ज्यांचे वय 99 वर्षाच्या पुढे आहे.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 13065 मतदान केंद्रांचे थेट वेबकास्टिंग केले जाणार आहे. गांधीनगरमध्ये राज्यस्तरीय देखरेख कक्ष स्थापन करण्यात आले आहे. येथून सकाळी 6.30 वाजेपासून मतदान संपेपर्यंत संपूर्ण निरीक्षण केले जाईल. गुजरातचे डीजीपी आशिष भाटिया यांनी सांगितले की, सुरक्षा व्यवस्थेसाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मतदारांनी कोणतीही भीती न बाळगता मतदान करता यावे यासाठी निमलष्करी दलही तैनात करण्यात आले आहे.

Gujrat Election News
राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार..उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

गुजरातमध्ये सलग सातव्यांदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपनेही आपली पूर्ण ताकद लावली आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही गुजरातमध्ये अनेक सभा घेतल्या. याशिवाय भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, यूपीचे मुख्यमंत्री योगी, हिमाचल प्रदेश, गोवा, आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते निवडणूक प्रचारात गुंतले होते. दुसरीकडे, मल्लिकार्जुन खरगे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर नेते काँग्रेसकडून रॅली काढत आहेत.

Gujrat Election News
Gram Panchayat Elections : होऊ दे खर्च ? : उमेदवारांच्या कोटींच्या उड्डाणाला निवडणूक आयोगाचा ब्रेक !

यावेळी निवडणुकीत आम आदमी पक्षातूनच चुरस पाहायला मिळत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील गुजरातमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांकडे पाहिले तर, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या टप्प्यात निवडणूक लढवत आहेत. याशिवाय आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी हे खंभलियातून रिंगणात आहेत. विरमगाममधून हार्दिक पटेल, गांधीनगर दक्षिणमधून अल्पेश ठाकोर रिंगणात आहेत.

आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया कटरगाममधून निवडणूक रिंगणात आहेत. भाजपचे माजी आमदार मधु श्रीवास्तव यावेळी वाघोडियातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com