Uddhav Thackeray News : आता आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रीपदी असो किंवा पुरूष असो मुख्यमंत्री करायचे आहे, असे सूचक वक्तव्य शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंती निमित्तानं मुंबईत आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, आता आपल्याला मशाल अशी मस्त निशाणी मिळाली आहे. आपल्याला महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया. शिवशक्ती भीम शक्ती आणि लहू शक्ती जर एकत्र आली तर, देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो. आता मी अनुभवतो आहे की, गद्दार मूठभर सुद्धा नाहीत आणि निष्ठावान डोंगराएवढे आहेत. आम्ही सुद्धा मंत्री होतो, पण आम्ही कधी थापा मारल्या नाहीत, असे म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.
ते पुढे म्हणाले, अण्णा भाऊ यांनी मुंबई मिळवून दिली. आता आपण काय करतोय? आता चित्र असं आहे की भूलथापा मारायच्या आणि संमोहित करायचं. आता मी घराबाहेर पडतो आहे, तरी यांच्या पोटात गोळा यायला लागलायं, मग मी करू तरी काय ? असा टोला देखील त्यांनीराज ठाकरेंना लगावला.
हा समाज हा दुर्लक्षित राहिला हे सत्य आहे. अण्णा भाऊ साठे यांनी मुंबई मिळवून दिली पण मुंबईमध्ये त्यांचं एक स्मारक नाही आणि त्यांना भारतरत्न अजून दिला नाही, अशी खंत ठाकरेंनी व्यक्त केली. तसेच, राज्यपाल आणि भाजप मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचाही खरपूस समाचार त्यांनी घेतला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलत असतांना महिला मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागल्या आहेत. ठाकरेंनी हे वक्तव्य विचार करूनच केलं असणार आणि त्यांच्या मनात मुख्यमंत्रीपदाबद्दल कोण महिला असेल तसेच ती महिला नेमकी शिवसेनेतील असणार की इतर कुठल्या पक्षातील ताकदीच्या महिला नेत्याला आयात करून उद्धव ठाकरे विरोधकांवर डाव टाकतात. याबाबतही चर्चा रंगत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.