Yusuf Pathan News : माजी क्रिकेटर आणि सध्याचे टीएमसीचे खासदार युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांनी गुजरात सरकार आपणाला त्रास देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. शिवाय या प्रकरणी ते आता हायकोर्टात पोहोचले आहेत.
तर बडोदा येथील वादग्रस्त जमिनीबाबत पठाण यांनी उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने महापालिकेला नोटीस पाठवून प्रकरणाशी संबंधित स्पष्टीकरण मागितलं आहे. (Gujarat High Court)
मागील काही दिवसांपूर्वी युसूफ पठाण यांना महापालिकेची सरकारी जमीन रिकामी करण्याची नोटीस मिळाली होती. यानंतर त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांनी 2012 साली आपण संबंधित जागा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केल्याचं म्हटलं आहे.
तसंच 2014 मध्ये महापालिकेने वेगळा प्रस्ताव आणून राज्य सरकारकडे पाठवला होता असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणी मागील10 वर्षांपासून कोणतीच कारवाई का केली नाही, असा सवाल आता उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आपली बाजू मांडताना केवळ मी दुसऱ्या पक्षातून खासदार झालो म्हणून नला त्रास दिला जात असल्याचा आरोप पठाण (Yusuf Pathan) यांनी केला. ते म्हणाले, "नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मी विजयी झालो. मात्र, मी दुसऱ्या पक्षातून निवडून आल्यामुळे मला त्रास दिला जात आहे. मागील 10 वर्षांपासून या प्रकरणाची कसलीही चौकशी केली गेली नाही. मात्र, निवडणूक निकालानंतर मला नोटीस पाठवली."
टीएमसी खासदार आणि माजी क्रिकेटर युसूफ पठाण यांनी सरकारी जमीन हडपल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक विजय पवार यांनी केला आहे. पवार यांच्या आरोपानंतर बडोदा महापालिकेने पठाण यांनी नोटीस बजावली आहे. महानगरपालिकेने ही जमीन युसूफ पठाणला देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोपही पवार यांनी केला. तर याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता.
मात्र याबाबतची महापालिकेची शिफारस सरकारने फेटाळून लावली होती. असं असतानाही पठाण यांनी याच जागेवर घरं बांधलं आहे. त्यामुळे हे घर जमीनदोस्त करा, अशी मागणी विजय पवार यांनी केली आहे. त्यामुळे आता न्यायालय या प्रकरणी काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.