Rahul Narwekar News : मोठी बातमी! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायालयाचा दणका; काय आहे प्रकरण?

BJP Leader And Assembly speaker Rahul Narwekar Fined By Court : भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विशेष सत्र न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीला हजर न राहिल्यानं ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Rahul Narwekar
Rahul Narwekarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे.अशातच राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेला संघर्ष दिवसेंदिवस टोकदार होत चालला आहे.

यावरुन सत्ताधारी- विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. तर दुसरीकडे भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना विशेष सत्र न्यायालयाने दणका दिला आहे.

कोरोनाकाळात वीज दरवाढीविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनात बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.याप्रकरणी भाजपच्या (BJP) 20 पदाधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात खटला सुरू आहे.खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना दंड ठोठावला आहे.

भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विशेष सत्र न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीला हजर न राहिल्यानं ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.या प्रकरणी पुढील सुनावणी 8 जुलै रोजी होणार असून तिला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Rahul Narwekar
Eknath Shinde Politics : किशोर दराडेंसाठी आता मुख्यमंत्री करणार बॅटिंग; मॅच जिंकणार का ?

काय आहे प्रकरण..?

कोरोनाकाळात वीज दरवाढीविरुद्ध भाजपकडून आंदोलन करण्यात आले होते.याच आंदोलनात बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण झाल्याचा आहे आरोप आहे.तसेच या मारहाणप्रकरणी भाजपच्या 20 पदाधिकाऱ्यांविरुद्ध सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.या खटल्याच्या सुनावणीला नार्वेकर गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जुलैला होणार आहे.

Rahul Narwekar
Ajit Pawar : अजितदादाचं गणित लय पक्कं; विधानपरिषदेत सर्व काही बेरजेत घेतलंय!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com