Gujarat elections : गुजरातमध्येही वाजला निवडणुकांचा बिगुल; बंगाल, तमिळनाडू आधीच निकाल, भाजपसमोर विरोधकांची सत्वपरीक्षा...

Gujarat local body elections 2026 : गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे गृह राज्य आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला महत्व प्राप्त होते.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Gujarat election schedule : देशात सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच गुजरातमध्येही निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काँटे की टक्कर आहे. या निवडणुकांचा निकाल ४ मे रोजी लागणार असून कुणाची सत्ता येणार, हे यादिवशी स्पष्ट होईल. पण त्याआधीच गुजरातमध्ये भाजपची सत्वपरीक्षा आहे.

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधी मिनी मंत्रालय असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आयोगाने बुधवारी या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. गुजरातमधील ८४ महानगरपालिका, ८४ नगरपालिका, ३४ जिल्हा पंचायती आणि २६० तालुका पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

सर्व निवडणुकांसाठी एकाचदिवशी म्हणजे २६ एप्रिलला मतदान होणार आहे. तर निवडणुकांची मतमोजणी २८ एप्रिलला होणार आहे. या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरूवात ६ एप्रिलपासून होईल. यावेळच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षित जागांसाठी नवीन चक्राकार पध्दत लागू करण्यात आली आहे.

Narendra Modi, Amit Shah
Union Minister case : भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना हायकोर्टाकडून मोठा झटका; खासदारकी जाणार? मिळाला होता ऐतिहासिक विजय

दरम्यान, गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला महत्व प्राप्त होते. गुजरातमध्ये अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवरही भाजपचाच झेंडा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने भाजपला आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे.

Narendra Modi, Amit Shah
Sharad Pawar-Sanjay Raut : तयारी सुरू, या माणसाची खरंच कमाल आहे! शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे सूचक विधान...

एकीकडे राज्यात भाजप मजबूत असताना दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह आम आदमी पक्षाला ताकद तुलनेने खूप कमी आहे. त्यामुळे आता विरोधक या निवडणूक भाजपला कशी टक्कर देणार, याकडे लक्ष लागले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेतील भाषणात बोलताना यावेळी गुजरातमध्ये विधानसभेत भाजप पराभूत होईल, असे विधान केले होते. त्याची पहिली पायरी स्थानिकच्या निवडणुका असून राहुल गांधींना या निवडणुकीतच करिष्मा करून दाखवावा लागणार आहे. त्यावर त्यांची विधानसभा निवडणुकांसाठीची वाटचाल स्पष्ट होणार आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com