PM Narendra Modi : नरेंद्र मोदींची ढाल बनले होते त्यांचे राजकीय गुरू! 22 वर्षांपूर्वी काय घडलं?

Guru Purnima Lal Krishna Advani Political Guru BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लालकृष्ण अडवाणी यांना आपले राजकीय गुरू मानतात. त्यांनी याबाबत अनेकदा उल्लेखही केला आहे.
Narendra Modi, Lal Krishna Advani
Narendra Modi, Lal Krishna AdvaniSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना दंगलीच्या मुद्यावरून त्यांचे पद धोक्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी त्यांच्यावर प्रचंड नाराज झाले होते. मोदींच्या राजीनाम्याचे संकेत मिळत होते. पण त्यांचे राजकीय गुरू ढाल बनून समोर उभे ठाकले अन् त्यांच्या पाठिशी उभे राहिले. ही ढाल होती ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची...

पंतप्रधान मोदी अडवाणींना आपले राजकीय गुरू मानतात. याबाबत त्यांनी अनेकदा उल्लेखही केला आहे. मोदींना गुजरातमधील राजकारणात सक्रीय करण्याचे काम अडवाणी यांनीच केल्याचे बोलले जाते. अडवाणींमुळे ते भाजपमध्ये आले आणि 1990 मध्ये मोदी त्यांचे सारथी बनले. राम मंदिरासाठी अडवाणी यांनी देशभरात रथयात्रा काढली. त्याची जबाबदारी मोदींच्या हातात दिली होती. अडवाणींचे ते सारथी बनले होते.

Narendra Modi, Lal Krishna Advani
Manoj Soni : UPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून काँग्रेस संतापली; मोदी सरकार अन् 'RSS'वर केला गंभीर आरोप

2002 मध्ये गुजरातमधील दंगलींनंतर मोदींच्या नेतृत्वावर काही नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यावेळी केंद्रातही भाजपचे सरकार होते. दिवंगत अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. दंगलीनंतर वाजपेयींनी मोदींनी राजधर्माचे पालन करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी मोदींनी राजीनामा द्यावा, असे वाजपेयींना वाटत होते. पण अडवाणी यांचा त्याला विरोध होता.

अडवाणी यांनी ‘माय कंट्री माय लाईफ’ या आपल्या आत्मचरित्रात त्याचा उल्लेख केला आहे. गुजरात दंगलीबाबत मोदींच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपण वाजपेयींशी सहमत नव्हतो, असे अडवाणी यांनी त्याते लिहिले आहे. गोध्रा दंगलीनंतर विरोधी पक्ष मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या राजीनाम्यावर अडून बसले होते. एनडीएतील काही पक्षही मोदींचा राजीनामा मागत होते. पण माझे मत त्याउलट होते, असे अडवाणी यांनी आत्मचित्रात म्हटले आहे.

Narendra Modi, Lal Krishna Advani
Manoj Soni : UPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून काँग्रेस संतापली; मोदी सरकार अन् 'RSS'वर केला गंभीर आरोप

गुरूदक्षिणा दिली...

लालकृष्ण अडवाणी यांना काही महिन्यांपूर्वीच भारतरत्न हा देशातील सर्वोच्च किताब देऊन सन्मानित करण्यात आले. मोदींची ही गुरूदक्षिणा असल्याची चर्चा त्यावेळी होती. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी अडवाणींचा सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर तिसऱ्यांदा एनडीएची सत्ता आल्यानंतर शपथविधीपूर्वी मोदींनी आपल्या गुरूची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com