Radhika Yadav Murder Case : दिल्ली-एनसीआरमध्ये एक धक्कादायक आणि बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ती म्हणजे गुरुग्रामच्या सेक्टर 57 मध्ये राहणाऱ्या राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची हत्या झाली असून ही हत्या तिच्याच वडिलांनी केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे लोकांचे टोमणे असह्य झाल्याने बापाने मुलीची हत्या केल्याचं आता उघडकीस आलं आहे. गुरूवारी गुरुग्राम येथील 25 वर्षीय टेनिसपटू राधिका यादवची तिच्या वडीलांनी गोळ्या हत्या केली. राधिकाच्या राहत्या घरात ही घटना घडली. तर मुलीची हत्या आपणच केल्याचं दीपक यादवने कबूल केलं आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असताना तिच्या वडिलांनी आपण मुलीची हत्या का केली याबाबतचं धक्कादायक कारण सांगितलं आहे. राधिकाचे वडील दीपक यादवने पोलिसांना सांगितलं की, "टेनिस अकादमी उघडल्यामुळे तो राधिकावर खूप रागावला होता. शिवाय तिला तिने सुरू केलेली अकादमी बंद करण्यासाठी अनेकदा समजावलं होतं पण तिने माझं ऐकलं नाही."
दरम्यान, राधिकाच्या अकादमीमुळे शेजारचे लोक मुलीच्या पैशांवर जगतोय असे टोमणे मारायचे. त्यामुळे तिने अकादमी बंद करावी अशी वडील दीपक याची इच्छा होती, पण तिने नकार दिला आणि याच वादातून त्याने राधिकाला गोळ्या घालून तिला ठार केल्याचं सहायक पोलीस आयुक्त यशवंत यादव यांनी सांगितलं.
टेनिस सामन्या दरम्यान राधिकाच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे ती मैदानात लवकर जाता येणार नव्हंत. त्यामुळे घरात कुठून तरी पैसे यावे यासाठी तिने अकादमी उघडण्याचा निर्णय घेतला. या अकादमीच्या पैशातून घरखर्च भागवता येईल असा तिचा विचार होता.
मात्र तिच्या वडीलांना अकादमी उघडण्याचा हा निर्णय मान्य नव्हता. शिवाय लोकांनी मुलीच्या जीवावर जगतोय असे टोमणे मारल्यामुळे बापाने अखेर आपल्या पोटच्या मुलीला संपवल्याचं उघडकीस आलं आहे.
राधिका गुरूग्राम सेक्टर-57 मधील राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावर किचनमध्ये काम करत असताना सकाळी साडे दहाच्या सुमारास वडील दीपक यादव याने परवाना धारक बंदुकीतून राधिकावर 5 गोळ्या झाडल्या. यापैकी 3 गोळ्या लागल्याने राधिकाचा मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी राधिकाची आई मंजू यादव देखील घरातच होती. तिला गोळीबाराचा आवाज आला. मात्र, ताप आल्यामुळे ती दुसऱ्या खोलीत विश्रांती घेत होती. दरम्यान, दीपक यादवच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.