Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या बैठकीनंतर गिरणी कामगारांना मोठा दिलासा, शेलू वांगणीतील घरांची सक्ती नाहीच, 'ती' अट देखील रद्द

Mumbai Homes for Mill Workers : "गिरणी कामगारांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घरे मिळवून देण्यासाठी कोटा निर्माण करण्याचा निर्णय घेतला जाईल. मुंबईतील मिठागरांच्या जागांवर गिरणी कामगारांच्या घरांसाठी जागा मिळावी अशी केंद्र सरकारकडे विनंती करण्यात येत असून या कामगारांना न्याय देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे."
Eknath Shinde
Minister Uday Samant addressing mill workers during a meeting at Azad Maidan, affirming the decision to provide homes in Mumbai itself supporting the demand for in-city housingSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 11 Jul : गिरणी कामगारांना शेलू, वांगणी येथे घर न देता मुंबईतच घर देण्याबाबत विचार करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. गिरणी कामगारांच्या घरासंदर्भात विविध संघटनांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली.

या बैठकीत गिरणी कामगारांना मुंबई परिसरात घरे देण्याबाबतचा निर्णय आणि त्यांना शेलू, वांगणी येथे घरे घेण्याबाबतची सक्ती करण्यात येणार नसल्याचंही सामंत यांनी या बैठकीनंतर सांगितलं.

तर एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीत शेलू, वांगणी येथे घर नाकारणाऱ्यांना घरच दिलं जाणार नाही, ही जाचक अट शासनाच्या जीआरमधून काढून टाकण्यात आल्याची माहिती गिरणी कामगार लढा समितीचे प्रमुख आमदार सचिन अहिर यांनी दिली.

मंत्री उदय सामंत यांनी आझाद मैदानावर गिरणी कामगारांना दिलेल्या आश्वासनानुसार शिंदेंच्या अध्यक्षतेखाली गिरणी कामगारांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत विधिमंडळात बैठक झाल्याचं सांगितलं. या बैठकीत शेलू येथील घरे घेण्याबाबत गिरणी कामगारांना कुठलीही सक्ती करण्यात आली नाही.

Eknath Shinde
Raj-Uddhav Thackeray: 'बाहेरुन आलेल्या ठाकरेंनाही महाराष्ट्रानं...'; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं धक्कादायक विधान

तसंच असा कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, याबाबत अपप्रचार केला जात असल्याचं सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे आता गिरणी कामगारांना मुंबई बाहेर नव्हे तर मुंबई परिसरातच घरे मिळण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde
Political Horoscope: मराठी-हिंदी वादावरून राजकारण तापणार

शेलू येथे घरे घेण्याची गिरणी कामगारांना सक्ती नसेल शिवाय 2024 मध्ये घर न घेतलेल्या कामगारांचा घराचा दावा संपुष्टात येणार नाही. याबाबत शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 17 रद्द करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तर गिरणी कामगारांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घरे मिळवून देण्यासाठी कोटा निर्माण करण्याचा निर्णय घेतला जाईल.

मुंबईतील मिठागरांच्या जागांवर गिरणी कामगारांच्या घरांसाठी जागा मिळावी अशी केंद्र सरकारकडे विनंती करण्यात येत असून या कामगारांना न्याय देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून आजच्या बैठकीत गिरणी कामगारांच्या हितासाठीचे निर्णय घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com