Harbhajan Singh Punjab news : भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेताच हरभजन सिंग यांना सरकारकडून पहिला झटका; काल घरावर गद्दार लिहिले अन् आज...

Punjab government security withdrawal : हरभजन सिंग यांच्या घराबाहेर आम आमदी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाताला काळी पट्टी बांधून त्यांच्या भूमिकेचा निषेध केला होता.
Harbhajan Singh (AI image)
Harbhajan Singh (AI image)Sarkarnama
Published on
Updated on

Punjab politics updates : आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला असून एकाचवेळी सात खासदारांनी भाजपच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या सात जणांपैकी माजी किक्रेटपटू हरभजन सिंग यांचाही समावेश आहे. ते राज्यसभेत पंजाबचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे समर्थन करत आपसह अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला होता.

हरभजन सिंग यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयानंतर आता पंजाब सरकारनेही त्यांना जोरदार झटका दिला आहे. सरकारने त्यांना पुरविलेली सुरक्षा परत घेतली आहे. त्यांच्या घराबाहेर सुरक्षारक्षकही हटविले आहेत. याबाबत हरभजन सिंग यांचे खासगी सहायक मनदीप सिंह यांनीच माहिती दिली आहे.

मनदीप सिंह यांनी सांगितले की, पंजाब सरकारने अचानक कारवाई करत सर्व पोलीस सुरक्षा परत घेतली आहे. हरभजन सिंग यांच्या घराबाहेर तैनात असलेल्या ९ ते १० पोलीस कर्मचाऱ्यांना हटविण्यात आले आहे. तसेच त्यांना दिलेली पायलट कारही परत घेण्यात आली आहे. पंजाब सरकारकडून हा पहिला झटका देण्यात आला आहे.

Harbhajan Singh (AI image)
Sharad Pawar party news : शरद पवारांच्या पक्षाच्या 'सोशल' प्रदेशाध्यक्षाला पोलिसांनी का ठोकल्या बेड्या? जाणून घ्या नेमकं कारण...

शनिवारीच हरभजन सिंग यांच्या घराबाहेर आम आमदी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाताला काळी पट्टी बांधून त्यांच्या भूमिकेचा निषेध केला होता. तसेच घराच्या भिंतींवर गद्दार असेही लिहिले होते. त्यावेळी त्यांच्या घराबाहेर सुरक्षारक्षकही तैनात होते. हरभजन सिंग यांच्यासह इतर सहा खासदारांना आपच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर आता पंजाब सरकारनेही कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

Harbhajan Singh (AI image)
राज्यसेवा परीक्षेत टॉपर, आता लाच घेताना अटक; कोण आहेत ‘या’ महिला अधिकारी?

दरम्यान, भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेल्या आपच्या सात खासदारांपैकी सहा खासदार हे पंजाबमधून निवडून गेले आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, भाजपला पंजाब आणि पंजाबी लोकांची नेहमीच समस्या राहिली आहे. पंजाबी लोकांच्या हिताची गोष्टीमध्ये भाजपकडून अडथळे आणले जातात. आम आमदी पक्ष कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठी आहे. काही लोकांच्या जाण्यामुळे पक्ष आणि पंजाबच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com