Sharad Pawar party news : शरद पवारांच्या पक्षाच्या 'सोशल' प्रदेशाध्यक्षाला पोलिसांनी का ठोकल्या बेड्या? जाणून घ्या नेमकं कारण...

Mahadev Balgude arrest, NCP leader arrest Maharashtra : तपासाअंती सायबर पोलिसांनी महादेव बालगुडे यांना गुरुवारी बेड्या ठोकल्या. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Mahadev Balgude arrest
Mahadev Balgude arrestSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेपार्ह आणि मॉर्फ केलेला फोटो सोशल मीडियावर प्रसारित करणे, तसेच बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेच्या कमांडरचे उदात्तीकरण करणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी महादेव विलास बालगुडे (वय ४०) याला बारामतीतून अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

महादेव बालगुडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया विंगचे राज्य प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर फेसबुक आणि ट्विटर  या माध्यमांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचा फोटो मॉर्फ करून तो सोशल मीडियावर शेअर करणे हिंसेला चिथावणी देणे मुख्यमंत्र्यांना चपलेने मारण्याचे आवाहन करून सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Mahadev Balgude arrest
अर्थसंकल्पातील एका घोषणेमुळे दिला मंत्रिपदाचा राजीनामा, आता मोदींकडून मोठी जबाबदारी; कोण आहे हा नेता?

नक्षलवाद्यांचे समर्थन करणे म्हणजेच सीपीआय (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेचा टॉप कमांडर माडवी हिडमा याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणारी पोस्टही बालगुडे यांनी केल्याचे तक्रारीत म्हणण्यात आले आहे. पुण्यातील वकील बसवराज यदवाड यांनी २२ एप्रिल रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

Mahadev Balgude arrest
राज्यसेवा परीक्षेत टॉपर, आता लाच घेताना अटक; कोण आहेत ‘या’ महिला अधिकारी?

तपासाअंती सायबर पोलिसांनी बालगुडे यांना गुरुवारी बेड्या ठोकल्या. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६(२) (मानहानी), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५३(१)(ब) (सार्वजनिक खोडसाळपणा) तसेच आयटी ॲक्टच्या कलम ६६सी (ओळख चोरी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com