Madhya Pradesh : मध्य प्रदेशात हरदा येथे मंगळवारी एका फटाका फॅक्टरीत मोठी आग लागली होती. या आगीत बारा जणांचा मृत्यू झाला तर 217 जण जखमी झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे आदेश दिले असून प्रशासनाने बारा कारखाने सील केले आहेत. हे घटनेनंतर मध्य प्रदेश विधिमंडळात विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात आले.
सरकारच्या या कारवाईवर काँग्रेसचे आमदार आर. के. दोगने (Congress MLA RK Dogne) समाधानी झाली नाहीत. ते हरदा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी गुरूवारी थेट सुतळी बॉम्बचा हार गळ्यात घालून विधानसभेत (Assembly) पोहचले. त्यानंतर त्यांनी आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलनही केले. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान आमदारांनी केलेल्या या कृतीमुळे खळबळ उडाली होती.
यावेळी बोलताना आमदार दोगने म्हणाले, चार लाखांची मदत आणि जिल्हाधिकारी व एसपीला हटवून काहीच होणार नाही. दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी. भाजप (BJP) नेत्यांच्या वरदहस्तामुळे ही अवैध फटाका फॅक्टरी सुरू होती. या प्रकरणात सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी, अशी टीका दोगने यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, हरदा येथील घटनेनंतर मध्य प्रदेशातील फटाका कारखान्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर आतापर्यंत 12 कारखाने सील करण्यात आले आहेत. नियमांचे पालन होत नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुख्यमंत्री यादव बुधवारी घटनास्थळी गेले होते. यावेळी त्यांनी दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकार ठोस पावले उचलेल, असे सांगत त्यांनी मृतांच्या कुटुबींय व जखमींची विचारपूस केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.