ED Action In Jharkhand : काँग्रेस खासदाराने दिली हेमंत सोरेन यांना BMW कार भेट? ईडीने बजावलं समन्स!

ED Action In Jharkhand : ईडीकडून मनी लाँड्रिंग संबंधित प्रकरणात काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांची चौकशी करण्याच्या तयारीत
ED Action In Jharkhand
ED Action In JharkhandSarkarnama
Published on
Updated on

Jharkhand News : झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. आता ईडीने याच प्रकरणात झारखंडमधील काँग्रेस खासदार धीरज साहू यांना समन्स पाठवण्यात आले आहे. धीरज साहू यांनी हेमंत सोरेन यांना बीएमडब्ल्यू कार भेट दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांची चौकशी करण्याच्या तयारीत आहे. (Latets Marathi News)

राज्यसभा खासदार असलेले धीरज साहू 64 वर्षांचे आहेत. यापूर्वीही जेव्हा आयकर विभागाने त्यांच्याशी संबंधित कंपनीमध्ये डिसेंबर महिन्यात 351.8 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. त्यावेळी आयकर विभागाच्या पथकाने ओडिशा येथील बाऊंड डिस्टिलरी प्रा. लि. (बीडीपीएल) विरोधात ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी या कंपनीचा प्रचार एका काँग्रेस खासदाराच्या कुटुंबातील सदस्यांकडून होत असल्याचे समोर आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ED Action In Jharkhand
Jharkhand Floor Test : झारखंडमध्ये आघाडी भक्कम; चंपई सोरेन यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

हेमंत सोरेन यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत ईडी साहू यांची चौकशी करणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय काही काळापूर्वी दिल्लीतील जेएमएम नेत्याच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या बीएमडब्ल्यू-एसयूव्ही संदर्भात ईडी टीम धीरज साहूंची चौकशी करणार आहे.

तपास यंत्रणेने बुधवारी गुरुग्रामच्या कारदारपूर गावात एका गुप्त ठिकाणी छापा टाकला. हरियाणा राज्याचा वाहन क्रमांक असलेली एसयूव्ही त्याच पत्त्यावर नोंदणीकृत असल्याचे सूत्रांनी सांगितले. याच प्रकरणी कोलकात्यातही दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. ईडीला संशय आहे की, हे वाहन धीरज साहू यांच्याशी संबंधित आहे.

ED Action In Jharkhand
Ncp News : किनवट मतदारसंघात 'तुम्ही बांधाल ते तोरण..; प्रदीप नाईकांचा गड शाबूत

माजी मुख्यमंत्री कोठडीत -

झारखंडमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात, ईडीने 48 वर्षीय हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. अटक होण्यापूर्वी हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. हेमंत सोरेन सध्या ईडीच्या कोठडीत आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com