काँग्रेस सोडताच हार्दिक पटेलांनी गायले अदानी-अंबानींचे गोडवे!

हार्दिक पटेल हे भाजप की आपसोबत जाणार याची चर्चा
Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in Marathi
Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in MarathiSarkarnama

अहमदाबाद : गुजरात (Gujarat) काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पक्षाला रामराम केला आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पटेल हे भाजप अथवा आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर आता खुद्द पटेल यांनीच खुलासा केला आहे. याचवेळी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांचं कौतुक केलं आहे. (Hardik Patel Latest News)

माझ्या आयुष्यातील तीन वर्षे मी काँग्रेसमध्ये वाया घालवली. मी काँग्रेसमध्ये नसतो तर नक्कीच गुजरातच्या भल्यासाठी केले असते. पक्षात असताना मला काम करण्याची संधी मिळाली नाही. तसेच, पक्षाकडूनही मला कोणते काम मिळालं नाही. एखाद्या उद्योगपती हा त्यांच्या कष्टाने मोठा होतो. तुम्ही प्रत्येक वेळी अदानी अन् अंबानींना शिव्या देऊ शकत नाही. पंतप्रधान गुजरातमधील आहेत म्हणून दरवेळी तुम्ही अदानी अन् अंबानीवर राग काढणार का? जनतेची दिशाभूल करण्याचा हा सगळा प्रकार आहे.

हार्दिक पटेल हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांच्या गुप्त बैठका दोन महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा होती. यामुळे काँग्रेसला रामराम केल्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी ते भाजप किंवा आपमध्ये उडी मारतील, असे बोलले जात आहे. यावर खुलासा करीत ते म्हणाले की, मी अद्याप भाजपमध्ये गेलेलो नाही. तसेच, याबाबत माझा अद्याप निर्णय झालेला नाही. गुजरामध्ये पाटीदार समाज अथवा इतर कोणताही समाज असो, त्यांना काँग्रेसमध्ये त्रास सहन करावा लागला आहे.

Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in Marathi
काँग्रेसचा नेता हत्तीवर बसून फिरत असतानाच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला अन्...

काँग्रेसमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, जनता कंटाळल्यानंतर आपोआप काँग्रेसला मतदान करेलय मी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी गुजरातमधील परिस्थितीबाबत चर्चा केली होती. त्यांनी विचारलं म्हणूनच ही माहिती मी त्यांना दिली होती. त्यानंतर मला दुर्लक्षित करण्यात आलं. त्यामुळं मी अखेर दु:खानं नव्हे तर धैर्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसमध्ये खरे बोलल्यास त्या व्यक्तीला बदनाम केले जाते. हीच त्यांची रणनीती असते, असेही हार्दिक पटेल म्हणाले.

Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in Marathi
सर्वोच्च न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा सुनावताच सिद्धू म्हणाले...

हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे ट्विट करीत जाहीर केले होते. ते म्हणाले होते की, आज मी मोठ्या धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातची जनता स्वागत करेल. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com