Vinesh Phogat : विनेश फोगाटच्या काँग्रेस प्रवेशावर बहीण नाराज; नेत्यांवर केला गंभीर आरोप

Babita Phogat Haryana Assembly Election 2024 BJP Congress : काँग्रेसने विनेश फोगाट यांना जुलाना मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांवरून कुटुंबात वाद सुरू झाल्याची चर्चा आहे.
Babita Phogat, Vinesh phogat
Babita Phogat, Vinesh phogatSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : हरियाणातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठी खेळी खेळली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमुळे चर्चेत आलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटला पक्षात आणून उमेदवारीही दिली आहे. पण त्यावरून आता कुटुंबातील अंतर्गत वाद समोर आला आहे.

विनेश यांच्या राजकारणातील प्रवेशावर त्यांचे गुरू व चुलते महावीर फोगाट यांनी नुकतीच उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. विनेशने राजकारणात न येता आणखी एका ऑलिम्पिकमध्ये खेळायला हवे होते, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता विनेशची चुलत बहीण बबिता फोगाट यांनीही काँग्रेसविषयी संताप व्यक्त केला आहे.

Babita Phogat, Vinesh phogat
Mahayuti Vs Mahavikas Aghadi : मराठवाड्यात चालणार 'मराठा पॅटर्न', विदर्भ, मुंबईत कोणता मुद्दा मतं फिरवणार?

काँग्रेसने आपल्या कुटुंबात भांडण लावल्याचा आरोप बबिता यांनी केला आहे. कुस्तीपटू असलेल्या बबिता यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विनेशच्या काँग्रेस प्रवेशावर त्या म्हणाल्या, फोगाट कुटुंबात वाद निर्माण करण्यात भूपिंदर हुडा यांना य़श आले आहे. पण लोक त्यांना धडा शिकवतील. फोडा आणि राज्य करा, हे काँग्रेसचे धोरण आहे. ते सतत कुटुंब फोडण्याचे काम करतात, अशी टीका बबिता यांनी केली आहे.

महावीर फोगाट हे विनेशचे गुरू आहेत. तिने गुरूंचे ऐकायला हवे. गुरू नेहमीच योग्य मार्ग दाखवतात, असा सल्लाही बबिता यांनी दिला. विनेशने कुस्तीतील आपल्या करिअरवर लक्ष द्यायला हवे होते. पुढील ऑलिम्पिकमध्ये ती सुवर्ण पदक जिंकू शकली असती, असा विश्वासही बबिता यांनी व्यक्त केला.

Babita Phogat, Vinesh phogat
Engineer Rashid : 5 वर्षे जेलमध्ये असलेला नेता प्रचारासाठी येतोय बाहेर; काश्मीरमध्ये कुणाला फोडणार घाम?

दरम्यान, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी मागील आठवड्यातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर विनेशला लगेच जुलाना मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. विनेशने मतदारसंघात प्रचारही सुरू आहे. दिल्लीत भाजपचे तत्कालीन खासदार बृजभूषण यांच्याविरोधात कुस्तीपटूंच्या आंदोलनात विनेशचा सक्रीय सहभाग होता. बृजभूषण यांनीही विनेशच्या राजकारणातील प्रवेशावर निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com