Engineer Rashid : 5 वर्षे जेलमध्ये असलेला नेता प्रचारासाठी येतोय बाहेर; काश्मीरमध्ये कुणाला फोडणार घाम?

Jammu and Kashmir Assembly Election 2024 BJP Congress : इंजिनिअर रशीद यांना एनआयएने 2019 मध्ये अटक केली आहे. तेव्हापासून ते तिहार तुरुंगात आहेत.
Engineer Rashid
Engineer RashidSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी बातमी समोर आली आहे. मागील पाच वर्षांपासून तिहार जेलमध्ये असलेले खासदार शेख रशीद उर्फ इंजिनिअर रशीद यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. निवडणुकीत खास प्रचारासाठी त्यांना जामीन देण्यात आला आहे.

तिहार जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही सुप्रीम कोर्टाने लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी अंतरिम जामीन दिला होता. त्याचप्रमाणे आता दिल्लीतील पटियाला कोर्टाने रशीद यांना 2 ऑक्टोबरपर्यंत जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचा प्रचार करता येणार आहे.

Engineer Rashid
Bihar Politics : बिहारच्या राजकारणात शाहरुख, अभिषेक बच्चनची एन्ट्री; प्रशांत किशोर यांची गुगली...

रशीद यांनी लोकसभा निवडणुकीत बारामुल्ला मतदारसंघात माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला आहे. त्यांनी तिहार तुरुंगातूनच निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळे आता रशीद यांना प्रचारासाठी जामीन मिळाल्यासे अब्दुल्ला यांच्यासह काँग्रेस, भाजपचेही टेन्शन वाढणार असल्याची चर्चा आहे.

रशीद यांना टेरर फंडिग प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने 2019 मध्ये अटक केले होती. तेव्हापासून ते जेलमध्येच आहेत. निवडणुकीनंतर त्यांना मोठ्या बंदोबस्तात सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी संसदेत आणले होते. त्यानंतर काही दिवसांतच विधानसभेची निवडणूक लागली आणि त्यांनी दिल्लीतील कोर्टात प्रचारासाठी अंतरिम जामीन मिळावा, अशी दाखल केली होती.

Engineer Rashid
Rahul Gandhi : जातीवर आधारित आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार? राहुल गांधींचं मोठं विधान

जम्मू आणि काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर असे तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. या कालावधीत रशीद यांना प्रचारासाठी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी रशीद यांनी 2008 आणि 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. अवामी इत्तेहाद पार्टी हा त्यांचा पक्ष असून त्यांनी या निवडणुका अपक्ष म्हणून लढवल्या होत्या.

अवामी इत्तेहाद पार्टीकडून अनेक जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. निवडणुकीनंतर आपला पक्ष किंगमेकर ठरणार असल्याचा दावा नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे रशीद यांचा पक्ष नेमका कुणाला दणका देणार आणि कुणाला सत्तेत आणणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी रशीद यांच्या भाजपच मदत करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांना निवडणुकीसाठी कुठून फंडिग येत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. आमचा पक्ष 50 वर्षे राजकारणात असूनही सर्वत्र उमेदवार उभे करण्याची आर्थिक क्षमता नाही. पण त्यांचे उमेदवार सर्वत्र उभे केले जात आहे, कोण आहे त्यांच्या मागे?, असे मुफ्ती यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com