Arvind Kejriwal : मतदारांनी केजरीवालांना नाकारले, ‘आप’ला लोळवले; दिल्लीसाठी धोक्याची घंटा

Haryana Assembly Election 2024 Result AAP : काँग्रेसशी आघाडी न करता आपने हरियाणामध्ये दिलेला ‘एकला चलो’चा नारा फोल ठरला आहे.
Haryana Election 2024 Result
Haryana Election 2024 ResultSarkarnama
Published on
Updated on

Election Results Updates : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. तर काँग्रेसचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. दुसरीकडे दोन्ही पक्षांना आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या आम आदमी पक्षाची दाणादाण उडाली आहे. जेलमधून सुटून आलेल्या अरविंद केजरीवाल यांना मतदारांनी विधानसभेत घुसू दिले नाही.

आपने राज्यात 90 पैकी 88 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यासाठी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया यांनीही जोरदार मोर्चेबांधणी केली. अनेक मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या. दिल्लीत मोफत वीज, शिक्षण, आरोग्य सुविधा आदी क्षेत्रांमध्ये झालेला बदल सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा परिणाम मतदारांवर झालेला दिसत नाही.

Haryana Election 2024 Result
Haryana Election Result : हरियाणात प्रशासनावर दबाव, काँग्रेसला भलतीच शंका; निवडणूक आयोगाकडे तक्रार

मतमोजणीमध्ये आपचा एकही उमेदवार विजयी होताना दिसत नाही. अनेक मतदारसंघात तर पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होऊ शकते. एक्झिट पोलमध्येही आपला एकही जागा मिळणार नाही, असे अंदाज वर्तवण्यात आले होते. ते खरे ठरताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीतही आपचा करिष्मा चालला नव्हता.

काँग्रेससोबत आघाडी नाही

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उमेदवार ठरवताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपशी आघाडी करण्याबाबत नेत्यांना सुचना केल्या होत्या. त्यानंतर नेत्यांच्या बैठकाही झाल्या. पण आपकडून राज्यात अवाजवी जागांची मागणी करण्यात आली. त्यास काँग्रेसने नकार दिल्यानंतर आपने उमेदवार जाहीर केले.

Haryana Election 2024 Result
Election Results 2024 LIVE : विनेश फोगाटच्या विजयानंतर ब्रिजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, काँग्रेसचे...

राज्यात आपला चांगला जनाधार मिळेल, असा आत्मविश्वास केजरीवालांना होता. पण हाच अतिआत्मविश्वास आपला नडल्याचे दिसते. काँग्रेससोबत आघाडी केली असती तर किमान एक-दोन आमदार निवडून आणत विधानसभेत पहिल्यांदाच प्रवेश करता आला असता.

दिल्लीसाठी धोक्याची घंटा

पुढीलवर्षी दिल्लीत विधानसभेची निवडणूक होणार आहे. हरियाणातील निकालाचा परिणाम दिल्लीच्या निवडणुकीवरही होण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांचे विकासाचे दावे हरियाणात फोल ठरले. त्यांनी मतदारांना अनेक आश्वासने दिली होती. पण मतदारांवर त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. दिल्लीत भाजपकडून हेच मुद्दे जोरकसपणे मांडत आपला अडचणीत आणले जाऊ शकते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com