Savitri Jindal : खासदाराची आई, श्रीमंत उमेदवार तरी भाजपनं तिकीट कापलं, अपक्ष लढल्या अन् इतिहास घडला

Haryana Assembly Election 2024 : भाजपला जम्मू आणि काश्मीरमध्ये झटका बसला असला तरी हरियाणामध्ये हॅट्ट्रिकच्या जवळ पोहचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘नवा काश्मीर’चा नारा फेल झाला आहे. राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून आघाडीचे 51 उमेदवार आघाडीवर आहेत.
 Savitri jindal.jpg
Savitri jindal.jpgSarkarnama
Published on
Updated on

Assembly Election 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या जम्मू आणि काश्मीरसह हरियाणा विधानसभा निवडणुकीचे आता निकाल समोर येत आहे.त्यात हरियाणात आप आणि काँग्रेसचा धुव्वा उडवत भाजपनं बहुमतासह दणदणीत विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे.

तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला जोरदार मुसंडी मारल्याचे आत्तापर्यंतच्या निकालात दिसून येत आहे. यातच हरियाणामध्ये भाजपनं (BJP) उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष निवडणूक लढलेल्या श्रीमंत महिला उमेदवाराने विजय खेचून आणला आहे.

हरियाणामधील (Haryana) हिसार विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सावित्री जिंदाल यांनी काँग्रेसच्या राम निवास रारा यांच्याविरोधात मोठी आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची फक्त औपचारिकताच बाकी आहे. तिथे जिंदाल यांना भाजपनं उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या आई सावित्री जिंदाल या हरियाणा विधानसभा निवडणुकीत उतरल्या होत्या. सावित्री जिंदाल यांना 12 व्या फेरीपर्यंत 49 हजार 231 तर काँग्रेसच्या राम निवास रारा यांना 30 हजार 290 मतं मिळाली होती. याठिकाणी भाजपनं उमेदवारी दिलेल्या कमल गुप्ता यांना तिसर्‍या क्रमांकाची 17385 फेकले गेले असून तिथे जिंदाल यांनी 18 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.

 Savitri jindal.jpg
Chief Minister News : हरियाणा, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ठरले; नेत्यांकडून मोठी घोषणा

सावित्री जिंदाल या भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला आहेत.त्यांची एकूण संपत्ती 4 हजार कोटी रुपयांची आहे. यंदा भाजपनं सावित्रीजिंदाल यांच्याऐवजी कमल गुप्ता यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण या लढतीत भाजपला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागण्याची चिन्हे आहेत.

निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.पण तरीदेखील भाजपनं तिकीट नाकारल्यामुळे त्या प्रचंड नाराज होत्या.त्यामुळेच त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

 Savitri jindal.jpg
Maharashtra Assembly Election 2024 : 'मविआ' आणि महायुतीमधील जागा वाटप फायनल? जाणून घ्या, कोणाला किती जागा

हरियाणामध्ये हॅट्ट्रिकच्या जवळ पोहचलेल्या भाजप जम्मू आणि काश्मीरमध्ये मात्र झटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘नवा काश्मीर’चा नारा फेल झाला आहे. राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून आघाडीचे 51 उमेदवार आघाडीवर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com