Vinesh Phogat Vs Kavita Dalal : विनेश फोगाटला ‘लेडी खली’ देणार टक्कर; ‘या’ पक्षाने टाकला मोठा डाव

Haryana Assembly Election Congress AAP : आपने कविता दलाल यांना जुलाना मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
Vinesh Phogat, Kavita Dalal
Vinesh Phogat, Kavita DalalSarkarnama
Published on
Updated on

Julana Constituency : हरियाणा विधानसभा निवढणुकीत जुलाना मतदारसंघातील निवडणुकीत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगाटला मैदानात उतरवल्यानंतर आता आम आदमी पक्षानेही एका महिला कुस्तीपटूलाच तिकीट दिले आहे.

आपने बुधवारी कविता दलाल यांना जुलाना मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. लेडी खली म्हणून ओळख असलेल्या कविता यांच्या उमेदवारीमुळे दोन महिला कुस्तीपटूंमध्ये हा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कविता या व्यावसायिक कुस्तीपटू असून WWE मध्ये जाणाऱ्या त्या पहिल्या महिला कुस्तीपटू आहेत. त्यांना कविता देवी म्हणून ओळखले जात होते.

Vinesh Phogat, Kavita Dalal
Rahul Gandhi on Reservation : राहुल गांधींनी काँग्रेसलाच अडकवलं चक्रव्यूहात; आता ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू...

कविता या मुळच्या हरियाणाच्या असून उत्तर प्रदेशात त्यांचे सासर आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांना तिकीट देत आपने विनेश समोर आव्हान उभे केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यापर्यंत पोहचल्यानंतर त्यांना वजन अधिक भरल्याने अपात्र घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

विनेश आणि कविता दोघीही कुस्तीपटू असल्याने मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल. पण सध्यातरी ही लढत अटीतटीची होऊ शकते. विनेशबाबत सहानुभूतीची लाट असल्याने तिचे पारडे जड आहे. विशेष म्हणजे दिल्लीत कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनाला कवितानेही पाठिंबा दिला होता. त्यामुळे निवडणुकीत या दोघी एकमेकांना कशा सामोरे जाणार, याबाबतही उत्सुकता वाढली आहे.

Vinesh Phogat, Kavita Dalal
Narendra Modi : मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट केलेल्या चौघांची फाशीची शिक्षा रद्द; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

कविता यांनी कुस्तीतही आपला करिष्मा दाखवला आहे. त्यांनी नंतर WWE मध्ये एन्ट्री केली होती. या प्रकारातही त्यांनी जगभरातील महिला पहिलवानांशी दोन हात करत आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे त्या लेडी खली म्हणूनही ओळखल्या जातात. कविता यांनी खली यांच्याकडूनही ट्रेनिंग घेतले होते.

2009 मध्ये त्यांचा विवाह झाला. एक मुल झाल्यानंतर त्यांनी कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण पतीपासून प्रेरणा घेत त्यांनी कुस्ती खेळणे सुरूच ठेवले. त्यानंतर 2017 ते 2021 अशी जवळपास चार वर्षे त्या WWE मध्ये होत्या. आता आम आदमी पक्षाकडून त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.      

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com