Narendra Modi : मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट केलेल्या चौघांची फाशीची शिक्षा रद्द; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Patna High Court Verdict Life Imprisonment : पटना हायकोर्टाने चार आरोपींची फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेच्या शिक्षेत केले आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Patna News : पटनामध्ये 11 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट घडवून आणलेल्या चौघा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. पटना हायकोर्टाने चौघांच्या फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत केले आहे. कोर्टाने बुधवारी ही महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना आता 30 वर्ष तुरुंगवासाठी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर यापूर्वीच आजीवान कारावासाची शिक्षा सुनावलेल्या दोन आरोपींची शिक्षा कोर्टाने कायम ठेवली आहे. मोदींच्या पटना येथील गांधी मैदानात झालेल्या सभेत 27 ऑक्टोबर 2013 रोजी बॉम्बस्फोट झाला होता.

Narendra Modi
Rahul Gandhi : अमेरिकेतील महिला खासदाराच्या भेटीने राहुल गांधी वादात; नेमकं काय आहे प्रकरण?

पटना येथील स्थानिक न्यायालयाने चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिले होते. बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर गांधी मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला होता.

मोदींच्या सभेवेळी पटना जंक्शनच्या फलाट क्रमांक 10 वर असलेल्या शौचालयात पहिला बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर गांधी मैदान तसेच इतर सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये सहा जणांचा मृत्यू तर 89 जण जखमी झाले होते. त्यावेळी सुशील कुमार शिंदे हे केंद्रात गृहमंत्री होते.

Narendra Modi
Amit Shah : राहुल गांधींवर अमित शाह भडकले; म्हणाले, जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत..! 

‘एनआयए’ने सर्व आरोपींविरोधात 2014 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. कोर्टात 187 जणांनी जबाब दिला होता. त्यानंतर स्थानिक कोर्टाने इम्तियाज आलम, हैदर अली, नुमान अंसारी आणि मोजिबुल्ला अंसारी यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला त्यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यावर बुधवारी कोर्टाने निकाल दिला.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com