Haryana Election Result : जिथं EVMची बॅटरी 99 टक्के, तिथं काँग्रेसचा पराभव! यावर निवडणूक आयोग काय बोलणार?

Congress BJP EVM : काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हा पराभव अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ईव्हीएमशी छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे.  
Haryana Election Result
Haryana Election ResultSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : हरियाणामध्ये झालेला धक्कादायक पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. हा पराभव स्वीकारण्याची पक्षातील नेत्यांची तयारी नाही. नेत्यांनी आता ईव्हीएमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि पवन खेडा यांनी मीडियाशी बोलताना अनेक गंभीर आरोप केले आहेत. हा निकाल अस्वीकारार्ह असल्याचे सांगत त्यांनी मतमोजणीतील त्रुटींबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हिसार, महेंद्रगढ आणि पानीपत जिल्ह्यांतून सातत्याने तक्रारी येत आहेत. याठिकाणी ईव्हीएमची बॅटरी 99 टक्के होती. तिथे काँग्रेसचा पराभव झाला, असे सांगत खेडांनी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा दावा केला.

Haryana Election Result
Jammu-Kashmir Election Result : राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा सुपडा साफ; किती उमेदवारांचे डिपॉझिट जप्त?

ज्या ईव्हीएम मशीनशी छेडछाड झाली नाही तिथे मशीनची बॅटरी 60 ते 70 टक्के होती. तिथे आम्हाला विजय मिळाल्याचेही खेडा यांनी सांगितले आहे. बॅटरीचे कारण देत मशीनमध्ये छेडछाड झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

हरियाणातील अनेक उमेदवार निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारी करत आहेत. काहींनी तक्रारी केल्या आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडेही पुढील काही दिवसांत याबाबत तक्रार करणार आहोत, असेही काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.

Haryana Election Result
Chief Minister News : हरियाणा, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ठरले; नेत्यांकडून मोठी घोषणा

हरियाणामध्ये भाजपला मिळालेला विजय हा ईव्हीएमचा विजय असून लोकशाहीचा पराभव झाल्याचे खेडा यांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्ही हा पराभव मान्य करत नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरूवातीच्या कलांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, असे चिन्ह दिसत होते. पण मतमोजणी पुढे सरकत गेली आणि चित्र पूर्णपणे पालटले. त्याचप्रमाणे एक्झिट पोलचे अंदाजही खोटे ठरले आहेत.

विजयाचे चिन्ह दिसत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी लाडू-जिलेबीही वाटली. पण त्यानंतर तास-दोन तासांतच पक्षाचे कार्यालय रिकामे झाले. त्यामुळे हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला. भाजपचे आकडे वाढू लागताच जयराम रमेश यांनी मतमोजणी आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरी अपडेटबाबत आक्षेप घेतला होता. तोच मुद्दा पराभवानंतरही काँग्रेसने लावून धरल्याचे दिसते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com